Political Explosion : भाजपमध्ये प्रवेशाची मालिका सुरूच!|Marathi News.

News@पक्षप्रवेश...

       Gadchandur BJP : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,यांचे विकासात्मक धोरण व कुशल नेतृत्वाला तसेच राजुरा विधानसभेचे तडफदार आमदार देवरावदादा भोंगळे,यांचा विकासाचा झंझावात व सर्वांना सोबत घेऊन सुरू असलेल्या वाटचालीला प्रभावीत होऊन उपरवाही येथील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी 18 ऑगस्ट सोमवार रोजी भारतीय जनता पार्टी(BJP)मध्ये जाहीर प्रवेश घेतला.आ. देवरावदादा भोंगळे यांनी सर्वांना पक्षाचे दुपट्टे घालून सन्मानपूर्वक पक्षात स्वागत केले.सदर पक्षप्रवेश कार्यक्रम गडचांदूर येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.     “सबका साथ,सबका विकास,सबका सन्मान,याप्रमाणे पक्षात सन्मानाची वागणूक दिली जाईल,कोणत्याही जनहिताच्या कामात,काही अडचण येत असेल तर,अर्ध्या रात्री संपर्क करावा,भाजप पक्ष सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.” अशी विश्वासात्मक ग्वाही आमदार देवरावदादा भोंगळे यांनी यावेळी दिली.                        “यांनी केला भाजपात प्रवेश.”

       आकाश सोमलकर,मंगेश एलादी,सचिन चिकराम,रवी कोटांगले,अतुल मडावी,प्रमोद काकडे,महेश मुसळे,अमित पानघाटे,किसन बावणे,संदीप देवाळकर,प्रशांत नवलकर, विनोद मडावी,अनील येवले,पुरुषोत्तम भुजाडे,प्रेम ढमणे, बापू काकडे,प्रवीण वडकी,आशिष जवादे,अनील बावणे, विकास सोमलकर,सचिन वडकी,रामकृष्ण मुसळे, कडीलाल सेन,मुरलीधर बोंडे,भाऊराव मते,वैभव जुनगरी, किसन चीकराम,संदीप देवाळकर,भूषण घुंगरूड,अभय जवादे,पांडुरंग विंचु,दिलीप घुंगरूड,गजानन मते,प्रमोद काकडे,अजय गोलापल्ली,अमित पानघाटे,भूषण मोरे, अतुल मडावी,सचिन चिकराम, आनिल बावणे,बब्लू कुमरे, प्रेमसागर ठमके(हरदोना), पुरुषोत्तम गुणाळे,योगेश कोटनाके,गजानन बावने,रवी कोटागले,सचिन घाटे,बापूजी काकडे,गणेश देवतळे, धनराज पिंपळशेंडे,मिथून क्षीरसागर,मंगेश एलादी,संदीप कोडे,महेश मुसळे,गजानन बावणे,अनील येवले,रंजीत डोंगे,मुकेश पोटे,अभय जवादे, सागर गेडाम,शंकर केळकर, सुनील सोमलकर,इतरांनी प्रवेश घेतला.

             “भाजपमध्ये इन्कमिंगची मालिका सुरूच.”

     'एकच वादा,देवराव दादा,विकासाचा वादा,देवराव दादा' हे ब्रिद वाक्य लक्षात घेऊन उपरवाही पाठोपाठ राजुरा विधानसभेतील इतर शहर, गावपातळीवरील विविध पक्षाचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.भविष्यात काय घडते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार हे मात्र विशेष! 

#Bharatiya Janata Party...

#Political Explosion...

#MLA Devraodada Bhongle...

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

-:Advertisement:-