Gadchandur : विधानसभेतील जनतेच्या सेवेसाठी राजुरा येथील आसिफाबाद रोडवर नव्या स्वरूपात नवनिर्मीत 'भाजपा जनसंपर्क कार्यालय,मा.आ.श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राचा' भव्यदिव्य असा लोकार्पण सोहळा 3 सप्टेंबर रोजी माजी मंत्री,आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.यावेळी जिल्ह्यातील व राजुरा विधानसभेतील भाजपच्या विविध आघाडीतील महिला पुरुष पदाधिकारी,कार्यकर्ते,मित्रपक्ष महायुतीचे पदिधिकारी,कार्यकर्ते तसेच सुधीरभाऊ आणि देवरावदादा,यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.MLA Devraodada Bhongl. दरम्यान या ऐतिहासिक लोकार्पण सोहळ्यानंतर आवाळपूर येथील शेतकरी संघटनेचे लिलाधर चटप,यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार,यांनी पक्षाचा दुप्पटा घालून चटप यांचा सन्मानपूर्वक पक्षात स्वागत केले.यावेळी भाजप जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजप कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे,माजी सरपंच प्रमोद कोडापे इतरांची प्रामुख्याने उपस्थिती होती. वेळेअभावी इतरांचा पक्षप्रवेश झाला नसून लवकरच आ. देवरावदादांची तारीख घेऊन आवाळपूर व परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती संबंधितांनी दिली आहे.
#BJP Rajura Vidhansabha. #MLA Devraodada Bhongle.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@