Ganpati Bappa Morya! Pudhchya Varshi Lavkar Ya : गणेश विसर्जन शांततेत संपन्न!| Marathi News.

News@Ganesh Visarjan 2025...

   Gadchandur : 'गणपती बाप्पा मोरया,मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' च्या जयघोषात 7 सप्टेंबर रोजी गडचांदूर शहरात गणेश विसर्जन पार पडले.शहरातील संपूर्ण गणेश मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.या शहरात जवळपास 20 गणेश मंडळ होते.सर्व गणेश मंडळांनी नियमांचे पालन करून ठरवून दिलेल्या वेळेत स्थानिक शिवाजी महाराज चौक येथे आपली मिरवणूक संपवली.अतीशय शांततेत हा गणेशोत्सव साजरा करण्यात आला.

  दरम्यान राजुरा विधानसभेचे आमदार देवरावदादा भोंगळे यांनी सदर गणेश विसर्जन मिरवणुकीला भेट दिली. भाजपतर्फे समस्त गणेश मंडळ,गणेश मंडळ अध्यक्ष व सहकार्यांचे शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यानिमित्ताने श्रीराम खिचडीचे वाटप करण्यात आले.सदर गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येने गणेश भक्तांची उपस्थिती होती.मिरवणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित प्रकार घडू यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनात गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.ठाणेदार शिवाजी कदम आणि त्यांच्या टीमचे भाजपच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. काही किरकोळ अपवाद वगळता शांततापूर्ण वातावरणात गणेश विसर्जन मिरवणुक संपन्न झाली.

#Ganesh Visarjan 2025. #Ganpati Bappa Morya! Pudhchya Varshi Lavkar Ya.

            @@@@@@@@@@@@@@@@@@@

-:Advertisement:-