Gadchandur : शहरातील श्री गणेश विसर्जनासाठी जाणारा रस्ता सध्याच्या परिस्थितीत अत्यंत खराब अवस्थेत असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्याने गणेश विसर्जनादरम्यान गणेश भक्तांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे.याच बरोबर रस्त्याच्या कडेला झाडांच्या फांद्या आणि विसर्जनाच्या मार्गावर विद्युत तार लोंबकळत असल्याने विसर्जन मिरवणुकीच्या वेळी अडथळा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी,लोंबकळत असलेल्या झाडाच्या फांद्या छाटाव्या आणि विद्युत तारांचा योग्यरीत्या बंदोबस्त करावा,यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीला अडथळा निर्माण होणार नाही.सदर समस्या तातडीने मार्गी लावण्याची विनंती गडचांदूर भाजपच्या एका शिष्टमंडळाने स्थानिक नगर परिषद मुख्याधिकारी,महावितरण उपविभाग अभियंता आणि सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंत्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.
शिष्टमंडात कोरपना तालुका भाजपा संघटन महामंत्री सतीश उपलेंचवार,भाजपा शहराध्यक्ष अरविंद डोहे,सतीश बेतावार,महामंत्री महेश घरोटे,रमेश चुदरी,अशोक झाडे, हरीष घोरे,यांची उपस्थिती होती.निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देत समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन संबधित विभागाच्या समस्त अधिकाऱ्यांनी दिली आहे.यांनी व्यवस्थितरित्या कामगिरी बजावली तर गणेश विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही प्रकारची अडचण,अडथळा निर्माण होणार नाही,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहेत.
#Ganesh Utsav 2025. #Dimond by Gadchandur BJP.
@@@@@@@@@@@@@@@