Eid Milad Un Nabi 2025 : जश्ने ईद मिलादून्नबी उत्साहात साजरी!| Marathi News.

News@Eid Milad Un Nabi...

     Gadchandur : “ईद-ए- मिलाद हा केवळ वाढदिवसाचा उत्सव नाही तर एक आध्यात्मिक अनुभव आहे.हा दिवस पैगंबरांच्या मानवता,सहिष्णूता आणि शांतीच्या संदेशांचे पुनरुज्जीवन करण्याची आणि त्यांना आपल्या दैनंदिन जीवनात स्वीकारण्याची संधी प्रदान करतो.हा सण लोकांना परस्पर प्रेम,बंधुता आणि सेवेसाठी प्रेरित करतो, जो पैगंबर मुहम्मद यांच्या शिकवणीचा मूळ सार आहे.” असे मत राजुरा विधानसभेचे आमदार देवरावदादा भोंगळे यांनी व्यक्त केले.ते 5 सप्टेंबर रोजी गडचांदूर येथे 'जश्ने ईद मिलादुन्नबी' निमित्य आयोजित भव्य मिरवणूकीला भेटी दरम्यान बोलत होते.

         गडचांदूर शहरात पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहो अलैहि वसल्लम यांची 1500 वी जयंती मोठ्या हर्षोल्लास व उत्साहात साजरी करण्यात आली.यानिमित्ताने सकाळी समस्त मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन स्थानिक रजा़ मशिदीपासून भव्य अशी मिरवणूक काढली,जी शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण करीत पुन्हा रजा़ मशिदीजवळ पोहोचली.यावेळी रस्त्याच्या कडेला विविध पक्ष व संघटनांच्या वतीने खाद्यपदार्थांचे वितरण करण्यात आले. गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष अरविंद डोहे,कोरपना तालुका भाजपा संघटन महामंत्री सतीश उपलेंचवार यांच्या मार्गदर्शनात आयोजित मिरवणुकीत सहभागी मुस्लिम बांधवांना आमदार भोंगळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.पुष्पवृष्टी व हस्तांदोलन आणि गळाभेट घेऊन सर्वांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. मिरवणुकीदरम्यान शहरातील वातावरण पूर्णपणे उत्साही दिसले.कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आल होता.

                             'शांतीसाठी प्रार्थना.'

सदर मिरवणुकीत लहानांपासून ते वृद्ध आणि तरुणांपर्यंत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.देश आणि राज्यात शांती,बंधुता,एकता आणि समृद्धीसाठी रजा़ मशिदीचे इमाम सैय्यद हसनैन रजा़,यांच्या माध्यमातून विशेष प्रार्थना करण्यात आली.मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांची यावेळी उपस्थिती होती.

#Eid Milad Un Nabi 2025.

##Eid-e-Miladunnabi Celebrated with Enthusiasm in Gadchandur City.

@@@@@@@@@@@@@@@

-:Advertisement:-