Chandrapur District police : 'ते' करणार होते आत्महत्या पण?|Marathi News.

News@Police...

           Chandrapur : जिल्ह्यातील नागभीड पोलीस स्टेशन येथे 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी हरवल्याची तक्रार दाखल झाली होती.ही मुलगी आपल्या गावातीलच अतुल गायकवाड वयवर्ष 29,याच्यासोबत पळून गेल्याचे तपासा दरम्यान निष्पन्न झाले.युगुलाने कुटुंबियांना दुरध्वनीवरून विषाची बाटली दाखवत आत्महत्या करण्याचा संदेश देखील पाठवला होता.त्यामुळे प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे या दोघांचा शेवटचा ठावठिकाण फलटण तालुक्यातील वेडोशी सावंतवाडा परिसरात असल्याचे शोधून काढले.

             दरम्यान चंद्रपूर पोलिसांनी तत्काळ फलटण ग्रामीण पोलिसांना प्रकरण कळवले.स्थानिक पोलीस पाटील,ग्राम सुरक्षा दल आणि गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात दोघांचा शोध लावला.फलटण पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेत विषाची बाटली जप्त करून त्या दोघांना पुढील कारवाईसाठी चंद्रपूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत.

#Chandrapur District Police.

#Police foil Suicide Attempt of Couple who Ran away from Home.

                        @@@@@@@@@@@@@@@@

-:Advertisement:-