Chandrapur District Police : दिड वर्षापासून फरार,खुनाचा आरोपी जेरबंद!|Marathi News.

News@Crime...

      Chandrapur : जिल्ह्यातील बल्लारपूर येथील झाकिर हुसेन वार्डातील रहिवासी सौ.ज्योती बालचंद्र कांबळे(34), यांनी 16 फेब्रुवारी 2024 रोजी पोलीस स्टेशनला येवून तोंडी रिपोर्ट दिली होती की,24 फेब्रुवारी 2021 रोजी पोस्टे.बल्लारपूर येथे नमूद गुन्ह्यातील आरोपी सिनू उर्फ आकाश दहागांवकर (29)रा.महाराणा प्रताप वार्ड बल्लारपूर,यास मृतक कु.अनामिका उर्फ रक्षा बालचंद्र कांबळे(19)वर्ष,हिच्या दिलेल्या तकारीवरून आरोपीला जेलमध्ये पाठविले होते. या गोष्टीचा राग मनात धरून मृतक अनामिका,हिला आरोपीने आपल्या घरी बोलावून तिच्या डोक्यात कोणत्यातरी अवजड साधानाने मारून तिचा खुन केला. अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून पोस्टे.अप.क्रं. 194/24 कलम 302 भा.द.वी.चा गुन्हा नोंद करून वेगवेगळी टीम तयार करून आरोपीचा शोध घेण्यात आला परंतू,मिळून आला नाही.घटनेपासून आजपावेतो आरोपीचा शोध घेण्यात येत होता.आरोपी वेळोवेळी इतर राज्य बदलून आपले अस्तित्व लपवून राहत होता.परंतू पोलीसांनी त्याचा पाठलाग करणे बंद केले नव्हते.

   दरम्यान नवनियुक्त प्रभारी अधिकारी बिपीन इंगळे,यांनी बल्लारपूर पोलीस स्टेशनचा पदभार सांभाळताच,त्यांनी डि.बी.पथक प्रमूख सपोनि.मदन दिवटे व सपोनि.शब्बीर पठाण,यांना नमूद खुनाच्या गुन्ह्यात फरार आरोपी श्रिनिवास,याचा शोध घेण्यास सुचवून व योग्य मार्गदर्शन करून आरोपीला लवकरात लवकर त्याचा शोध घेवून अटक करण्याची सूचना दिली.त्यावरून डि.बी.पथकातील अंमलदारांनी आरोपीचा भौतिक व तांत्रिक बाबींचा विश्लेषण करून आरोपीच्या अचूक ठिकाणाचा शोधून व आज रोजी आरोपी हा आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी येणार असल्याची खात्रिशिर माहितीवरून डि.बी.पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेवून नमूद गुन्ह्यात सपोनि.शब्बीर पठाण,यांनी त्याला अटक करून मा.न्यायलयात हजर केले असता 8 सप्टेंबर 2025 पर्यंत आरोपी पोलीस कोठडी रिमांड मिळालेला आहे.

     सदर गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,राजुरा उपविपो.अधिकारी सुधिर नंदनवार,यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक बिपिन एस.इंगळे,सपोनि.मदन दिवटे, शब्बीर खान पठाण,पोस्टॉप.सफौ.रणविजय ठाकुर,आनंद परचाके,पोहवा संतोष पंडित,सुनिल कामटकर,पुरूषोत्तम चिकाटे,संतोष दंडेवार,सत्यवान कोटनाके,विकास जुमनाके,भास्कर चिचवलकर,नापोअं.सचिन अल्लेवार, पोअं.शरदचंद्र कारूष,खंडेराव माने,सचिन राठोड,मिलिंद आत्राम,लखन चव्हाण,मपोअं.शालिनी नैताम पोस्टे बल्लारपूर यांनी केली आहे.

#Great work. #Chandrapur District Police.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

-:Advertisement:-