Brown Sugar Durg Seized : ब्राऊन शुगरची तस्करी करणाऱ्या दोघांना बेड्या!|Marathi News

News@Crime...

    Chandrapur : स्थानिक गुन्हे शाखा(LCB)च्या पथकाला 6 सप्टेंबर रोजी माहिती मिळाली की,नागपूर मार्गे चंद्रपूर शहरात एका कारद्वारे ब्राऊन शुगर ड्रग्स पावडर(गर्द)ची विक्रीसाठी तस्करी होत आहे.या विश्वसनीय माहितीवरून तात्काळ नागपूर-चंद्रपूर रोडवरील पडोली चौक,येथे सापळा रचून चंद्रपूरच्या दिशेने येणाऱ्या कारला थांबवून पंचासमक्ष झडती घेतली असता कारमध्ये ब्राऊन शुगर मिळून आली.यावरून वाहनातील आरोपी नितीन उर्फ छोटु शंकर गोवर्धन वयवर्ष 42 रा.महात्मा फुले वार्ड बाबूपेठ चंद्रपूर,त्याचा साथीदार साहिल सतीश लांबदुरवार वयवर्ष 23 रा.भिवापूर वार्ड चंद्रपूर,यांना ताब्यात घेवून एकूण 298 ग्रॅम ब्राऊन शुगर,हेरॉईनसह गुन्ह्यात वापरलेली कार,रोख रक्कम व मोबाईल,असा एकूण 30 लाख,19 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीस स्टेशन पडोली येथे दोन्ही आरोपींविरुद्ध संबंधीत कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पडोली पोलीस करीत आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, यांच्या मार्गदर्शनात LCBचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पडोली पोस्टे.सपोनि.योगेश हिवसे,LCB सपोनि.दिपक कॉक्रेडवार,सपोनि.बलराम झाडोकर, पोउपनि.संतोष निंभोरकर,पोउपनि.विनोद भुरले,पोउपनि. सर्वेश बेलसरे,पोउपनि.सुनिल गौरकार,सफौ.धनराज करकाडे,स्वामी चालेकर,पोहवा.नितीन रायपूरे,संतोष येलपुलवार,चेतन गज्जलवार,गणेश मोहुर्ले,गणेश भोयर, जयसिंग,सुरेद्र महंतो,सचिन गुरनुले,दिपक डोंगरे, विजयमाला वाघमारे,पोअं किशोर वाकाटे,शंशाक बादामवार,मिलींद जांभुळे,सुमित बरडे,अजित शेंडे,प्रफुल्ल गारघाटे,चापोहवा.प्रमोद डंभारे,मिलींद टेकाम आणि सायबर पोलीस स्टेशन च़द्रपूर यांनी केली आहे.

#Brown Sugar Durg Seized.

#Action by Local Crime Branch Chandrapur.

@@@@@@@@@@@@@@@

-:Advertisement:-