Chandrapur : जिल्ह्यातील राजुरा,येथील शिवाजी वॉर्ड येथे 'श्री छत्रपती गणेश मंडळा'च्या वतीने 2 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.यामध्ये गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन रक्तदान केले. 'रक्तदान श्रेष्ठ दान' ही संकल्पना लक्षात घेऊन इतर जनहिताच्या उपक्रमांसह यंदा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 'सध्याच्या परिस्थितीत असे उपक्रम राबविणे गरजेचे आहे.या मंडळाच्या तरुणांनी राबविलेले हे उपक्रम कौतुकास्पद असून,यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचविले जाऊ शकते,इतर गणेश मंडळांनी सुद्धा याचे अनुकरण करावेत,' असे मत यावेळी व्यक्त होताना दिसले.
'एक हाथ मदतीचा' ही भावना प्रत्येक मनामध्ये सतत जागृत ठेवण्यासाठी,गणेशोत्सवाच्या या पावन पर्वावर मंडळाच्या युवा मित्रांच्या सहयोगाने सदर उपक्रम राबविण्यात आल्याचे मौलिक मत 'श्री छत्रपती गणेश मंडळ' अध्यक्ष श्रीनात बोलुवार आणि उपाध्यक्ष सुरज बोबडे,यांनी यावेळी व्यक्त केले आहेत.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सदस्य साहिल काटवले,संदीप भताने,आदित्य आवारी,ओम पारखी,वेदांत पाचभाई, हर्षदीप नहार,अक्षय भगत,मोहन बोबडे,गणेश बोबडे, अमोल मालेकर,विवेक लोंगाडगे,संतोष पाचभाई,समय भगत,तनूज गोनेलवार इत्यादींनी अथक परिश्रम घेतले. यावेळी गणेश भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
#Ganesh Utsav 2025. #Blood Donation camp Rajura.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@