Bramhapuri : ब्रम्हपुरी-वडसा महामार्गावर अचानक एका कारला आग लागल्याची धक्कादायक घटना 28 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडली.काही सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्याने बर्याच लोकांना सदर घटनेची माहिती कळली.जळालेली कार इंडिका कार असल्याचे कळते.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,सदर कार पुराम कुटुंबाची होती.ते परिवारासोबत दवाखान्यात जात असल्याचे समजते.कारमध्ये चार व्यक्ती होते.बातमी लिहिस्तोवर कोणतीही जीवीत अथवा वित्तहानी झाल्याची माहिती मिळाली नाही.आग कशामुळे लागली? चित्र स्पष्ट नसले तरी,ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी,अशी शंका व्यक्त होत आहे.दरम्यान कारला लागलेल्या आगीला अग्निशमन दलाच्या सहाय्याने आटोक्यात आणले होते. विशेष म्हणजे कारच्या इंजिनला अचानक आग लागल्याचेही बोलले जात आहे.
#The Burning Car.
#Bramhapuri.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@