Swachh Survekshan 2025 : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया!|Marathi News.

News@गणेशोत्सव 2025...

   Gadchandur : गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली असून वातावरणात चैतन्य,उत्साह पसरला आहेत.शासन आणि संबंधीत जिल्हा प्रशासनाच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रम राबवण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात येत आहेत.याच पार्श्वभूमीवर कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहर,येथेही पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रम राबविण्यात येत आहे.हरिततालिका पूजा आणि घरगुती मातीच्या गणेश मुर्तीचे विसर्जनासाठी नगर परिषदेतर्फे कृत्रिम तलाव बनविण्यात आलेले आहे. सर्वांनी आपापल्या घरच्या श्रींच्या मूर्तीचे विसर्जन या कृत्रिम तलावातच करावे.तसेच निर्माल्य,हे निर्माल्य कलशातच टाकावे.असे आवाहन नगर परिषद प्रशासनातर्फे शहरातील सर्व गणेश भक्तांना करण्यात आले आहेत.

              'बघा कृत्रिम तलावांचे ठिकाण' 

1) वीर बाबुराव शेडमाके चौक.

2) महात्मा गांधी चौक.

3) महात्मा जोतिबा फुले व्यापार संकुल.

चला तर मग पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया.

#Swachh Survekshan 2025.

#Gadchandur Nagar Parishad.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

-:Advertisement:-