Sand Thief : अवैधरित्या रेती चोरीवर पोलिसांची कारवाई!|Marathi News.

News@Crime...

       Chandrapur : जिल्ह्यातील भद्रावती पोलिसांना 30 ऑगस्ट रोजी अवैधरित्या रेती चोरी करून ट्रॅक्टरद्वारे वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली.सदर माहितीवरून पोलीसांनी तात्काळ मानोरा फाटा येथे सापळा रचून नाकाबंदी केली असता,एक ट्रॅक्टर मांगली रोडवरुन भद्रावतीकडे येतांना दिसून आला.त्याला थांबवून पंचासमक्ष वाहनाची पाहणी केली तेव्हा सदर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये अंदाजे 1 ब्रास रेती अवैधरित्या वाहतुक करीत असतांना मिळून आली.यावरून ट्रॅक्टर वरील आरोपी राजू पुरुषोत्तम शिरपूरकर (39),अक्षय अशोक बोढेकर(28) दोन्ही रा.मांगली, यांच्या ताब्यातील एक महिंद्र ट्रॅक्टर क्रं. MH/29/ V/1713 व ट्रॉली आणि त्यातील 1 ब्रास रेती, असा एकूण 4 लाख,5 हजारांचा माल जप्त करून आरोपींना अटक करण्यात आली.यांच्याविरुद्ध भद्रावती पोलीस स्टेशन येथे संबंधीत कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,वरोरा उपविपो. अधिकारी संतोष बाकल,यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी,यांच्या नेतृत्वात मपोउपनि. प्रियंका गेडाम,पोअं.जगदीश झाडे,विजय उपरे, संतोष राठोड,योगेश घुगे,सर्व पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली आहे.

#Chandrapur District Crime News.

#Sand Smuggling.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

-:Advertisement:-