Jiwati Ganja Sale Case : गांजा विक्रेत्याला बेड्या!|Marathi News.

News@Crime...

             Chandrapur : जिल्ह्यातील जिवती पोलिसांना 28 ऑगस्ट रोजी गांजा विक्री संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार शेणगाव येथील संभाजी उर्फ पिंटू शिवाजी कत्ते, वयवर्ष 39,याच्या राहत्या घरी पंचासमक्ष धाड टाकून घराची झडती घेतली असता स्वयंपाक खोलीत एका निळ्या रंगाच्या ड्रममध्ये ठेवलेल्या प्लास्टिक पिशवीत गांजा सापडला.सदर आरोपीला ताब्यात घेऊन एकूण 860 ग्रॅम गांजा किं.अंदाजे 8 हजार 600 रुपये,जप्त करून जिवती पोलीस स्टेशन येथे आरोपींविरुद्ध संबंधीत कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र जाधव,यांच्या मार्गदर्शनात जिवती पोलीस स्टेशनचे ठाणेदार सपोनि.प्रवीण जाधव,यांच्या नेतृत्वात पोउपनि.निखील रहाटे,पोहवा.नारायण गवाले, पोअं.जगदीश मुंडे,पोअं.ज्ञानेश्वर डोकळे,मपोअं.किरण वाटोरे,पोअं.भाविक टेकाम,पोअं.अभिषेक आडे,मपोअं. प्रियंका राठोड,मपोअं.शिल्पा कातकर,यांनी केली असून सदर प्रकरणी अधिकची तपास जिवती पोलीस करीत आहेत.

#Chandrapur District Crime News.

#Jiwati Ganja Sale Case.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

-:Advertisement:-