Chandrapur : जिल्ह्यातील जिवती पोलीस 29 ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंगवर असतांना एक पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी संशयास्पद स्थितीत वणी(बु) मार्गे परमडोलीकडे जाताना दिसली.सदर पिकअप वाहनाला थांबवून पाहणी केली असता,त्या वाहनाच्या डाल्यामध्ये गोवंश जातीचे 3 बैल बांधलेल्या स्थितीत दिसून आले.सदर वाहन चालकाला बैल आणि प्रमाणपत्र, पावतीबाबत पोलिसांनी विचारले असता तो उडवाउडवीचे उत्तरे देत होता.तेव्हा बैलांची अवैधरित्या वाहतूक करून बैल कतलीसाठी तेलंगणात नेत असल्याची खात्री झाल्याने सदरची पिकअप वाहन क्रं.MH/34/BZ/8428,कि.अंदाजे 4 लाख,50 हजार व 3 पांढऱ्या रंगाचे बैल किं.अंदाजे 60 हजार,असा एकूण 5 लाख,10 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन वाहन चालक प्रमोद बंडू सातपूते(29)रा.घनोटी तुकूम,ता.पोंभूर्णा,जिल्हा चंद्रपूर व वाहनात असलेले राजकूमार चतूरदास शेंडे(32)रा.सातारा कोमटी,ता. पोंभूर्णा,जिल्हा चंद्रपूर,पारस चतूरदास शेंडे(35)रा.सातारा कोमटी,ता.पोंभूर्णा जिल्हा चंद्रपूर,यांच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये जिवती पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याची तपास जिवती पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,गडचांदूर उपविपो. अधिकारी रविंद्र जाधव,यांच्या मार्गदर्शनात,ठाणेदार सपोनि.प्रविण जाधव,पोउपनि.दिलीप पोले,सफौ. पुरुषोत्तम पंधरे,पोअं.जगदिश मुंडे,पोअं.अतुल कानवटे, पोअं.किरण वाठोरे,पोअं.ज्ञानेश्वर डोकळे,मपोअं.रजनी निखाडे,इतरांनी केली आहे.
#Chandrapur District Crime News.
#Illegal Transportation of Cattle.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@