Jiwati : तालुक्यातील पिट्टीगुडा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या अनेक गावात विविध अवैध धंद्यांना कमालीचे उधाण आले आहे.अवैधरित्या दारूविक्री,गांजा इतर अवैध धंदे जोमात सुरू असल्याचे दिसून येत आहे.ही बाब विविध माध्यमांतून लक्षात आणून देण्याचा प्रयत्न झाला मात्र, संबंधित पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप होत आहे.या अवैध धंद्यांमुळे अनेक संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर असून वारंवार सांगूनही कारवाई होत नसल्याने अखेर 28 ऑगस्ट रोजी पल्लेझरी येथील महिलांनी गावात सुरू असलेली अवैध दारू पकडून दिली आहे.महिलांच्या या धाडसाचे कौतुक होत असताना संबंधित पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.यापुढे गावात अवैध दारू विक्री होऊ देणार नाही!असा निर्धार महिलांनी केल्याचे कळते.
महिलांनी दारू विक्रेत्याकडून देशी दारूचे 49 पव्वे कींमत 2 हजार 450,पकडून याची माहिती पिट्टीगुडाचे ठाणेदारांना दिली असता पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर ठिकाणी जाऊन दारू विक्रेत्याला ताब्यात घेतले.संबंधीत कलमान्वये दारू विक्रेत्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे कळते.एकीकडे जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन जिल्ह्यातील विविध अवैध धंद्यांवर अंकुश लावण्यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे याठिकाणी अवैध धंदे जोरात सुरू असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.याठिकाणी आता पुढे काय घडते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
#Illegal liquor.
#Action against illegal liquor sale.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@