Gas Cylinder Explosion: गॅस सिलेंडरच्या स्फोटात 6 जण जखमी!| Marathi News.

News@Shocking...

           Chandrapur : जिल्ह्यातील मूल तालुक्यातून एक धक्कादाय घटना समोर आली आहे.मूलपासून 3 किमी. अंतरावर असलेल्या आकापूर लगतच्या राज्य औद्योगिक विकास वसाहतीच्या परीसरात एका गॅस सिलेंडरच्या गोदामात काल सिलेंडरचा स्फोट होऊन एकाच कुटूंबातील 6 जण जखमी झाल्याची माहिती आहे.या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नसून गोदामाची सुरक्षा व घटने विषयी अनेक शंका व्यक्त होताना दिसत आहेत.

    सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,मूल येथील HP गॅस सिलेंडर विक्रेता संजय फ्लेम एजन्सीचे गडचिरोली मार्गालगतच्या राज्य औद्योगिक विकास वसाहती,आकापूर येथे सिलेंडरचे गोदाम आहे.एजन्सीमध्ये डिलीव्हरी बॉय म्हणून काम करणारे राजस्थान राज्यातील श्रीचंद बिश्नोई, श्रीराम बिश्नोई,कैलास बिश्नोई,रमेश बिश्नोई,महिंद्रा बिश्नोई, रतीराम बिश्नोई,हे युवक ग्राहकांना घरपोच सिलेंडरची डिलीव्हरी देण्यासाठी वाहनांमध्ये सिलेंडर ठेवत असतांना गॅसने भरलेला सिलेंडर अचानकपणे जमीनीवर पडल्याने त्याचा स्फोट झाला.त्यामूळे परीसर अक्षरशः हादरून गेला. स्फोटात श्रीचंद बिश्नोई,श्रीराम बिश्नोई,कैलास बिश्नोई, रमेश बिश्नोई,महिंद्रा बिश्नोई,रतीराम बिश्नोई,यांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली.घटनेची माहीती होताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात हलविले.

     ग्राहकांच्या घरांपर्यंत गॅस सिलेंडर पोहोचवून देण्यासाठी सिलेंडर वाहनांमध्ये ठेवत असतांना सिलेंडर जमीनीवर पडल्याने स्फोट झाल्याचे पोलीसांनी सांगितले.असे असतांना मात्र,सदर घटना गॅस भरलेल्या सिलेंडरमधून रिकाम्या सिलेंडरमध्ये गॅस भरतांना घडली असावी? अशी चर्चा परिसरात सुरू आहे.दरम्यान जखमींवर चंद्रपूर येथील डॉ.कुबेर यांच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. घटनेचा तपास मूलचे पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनात सपोनि.सुबोध वंजारी करीत आहे.

#Gas cylinder Explosion.

#Shocking News in Mul Taluka ..

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

-:Advertisement:-