Ganesh Utsav 2025 : येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा कायम!| Marathi News.

News@Ganesh Utsav 2025...

Korpana : विघ्नहर्ता श्री गणरायाचे आगमन झाले असून सर्वत्र मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे.याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टप्प्यात असलेल्या कोरपना येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा कायम असून याठिकाणी हिंदू-मुस्लिम समाज बांधव गेल्या अनेक वर्षांपासून एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा करत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.गांधी चौक येथील गणेश मंडपाजवळ मुस्लिम समाजाची मशीद आहे.दररोज पाच वेळ येथे अजान पुकारली जाते.गणेश मंडळ यावेळी मोठ्या आदर व श्रद्देने याचे पालन करतात. यामुळे सामाजिक सलोखा कायम राहतो,असे मत व्यक्त होत आहे.

अनेक ठिकाणी गणेशोत्सवात मुस्लिम समुदाय उत्साहाने सहभागी होतो.ते मिरवणुकीत सामील होतात,आपल्या धार्मिक स्थळांवर प्रार्थना करतात आणि हिंदू बांधवांसोबत सण साजरा करतात.हा उत्सव समुदायांमधील संबंध दृढ करतात आणि समाजात सलोखा व सामंजस्य निर्माण करतात.यामुळे धार्मिक आणि सांप्रदायिक विभागणीपेक्षा एकता महत्त्वाची आहे,हे यावरून अधोरेखित होते. थोडक्यात,गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण नसून तो हिंदू-मुस्लिम समुदायांना एकत्र आणणारा आणि त्यांच्यातील ऐक्य व सलोख्याचे प्रतीक असलेला एक सामाजिक उत्सव बनला आहे.दरम्यान कोरपना येथील एका गणेश मंडपात नगरसेवक निसार एजाज शेख, सामाजिक कार्यकर्ता शहेबाज अली,नदीम,मालेकर,धोटे यांच्यासह कोरपना पोलीस स्टेशनचे सपोनि.केकन व पोलीस कर्मचारी,आदिंची उपस्थिती दिसून आली.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

-:Advertisement:-