Chandrapur : माता नगर भिवापूर वार्ड येथील रहिवासी महेश गौतम काळे,यांनी 20 ऑगस्ट रोजी शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली की,माझी हिरो होंडा स्प्लेंडर बाईक क्रं.MH/34/U/5214,रात्री घरासमोरील रोडच्या बाजूला ठेवली होती.सकाळी पाहिली तर त्याठिकाणी बाईक नव्हती.आजुबाजुला शोध घेतला असता,ती मिळाली नाही. कोणीतरी अज्ञात चोराने माझी बाईक चोरून नेली.अशा तोंडी तक्रारीवरून संबंधीत कलमान्वये गुन्ह्याची नोंद करून तपास करण्यात आला.दरम्यान 29 ऑगस्ट रोजी तपापासा दरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, सदर बाईक सुमीत शांताराम अमराजवार(28)रा.भिवापूर वार्ड चंद्रपूर,तनवीर कदीर बेग(25)रा.भिवापूर वार्ड चंद्रपूर,यांनी चोरी केली आहे.
पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता यांनी गुन्ह्याची कबूली दिली.आणि सत्तार शम्मी खान(32)रा.पडोली,याने सदर बाईकचे ग्रॅन्डर कटर मशीनने तुकडे केले.काही तुकडे स्वत:जवळ ठेवले,काही जाकीर कासम शेख(31)रा.भिवापूर वार्ड चंद्रपूर,याच्याकडे दिले. अशाप्रकारे सदर आरोपींकडून चोरीची हिरो होंडा स्प्लेंडर बाईकसह पुन्हा एक जूनी बाईकचे तुटलेले पार्ट्स किं. अंदाजे 40 हजार,एक ग्रॅन्डर कटर मशिन किं.2 हजार,असा एकूण 57 हजार रुपयांचा माल जप्त करून आरोपींविरुद्ध संबंधीत कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,उपविपोअ.सुधाकर यादव,यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस स्टेशनचे पोनि. निशीकांत रामटेके,यांच्या नेतृत्वात सपोनि.राजेंद्र सोनवणे, पोउपनि.दत्तात्रय कोलते,पोउपनि.विलास निकोडे व त्यांच्या डिबी.पथक कर्म मपोहवा.भावना रामटेके,पोहवा. सचिन बोरकर,संजय धोटे,लक्ष्मण रामटेके,निकेश ढेंगे, जावेद सिद्दीकी,कपूरचंद खरवार,पोअं.रूपेश पराते,विक्रम मेश्राम,योगेश पिदूरकर,निलेश ढोक,सारीका गौरकार, दिपीका झिंगरे,यांनी केली आहे.सदरचा तपास मेजर कपूरचंद खरवार करीत आहे.
#Chandrapur District Crime News. #Bike Thief.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@