Gadchiroli : चामोर्शी येथील समिक्षा ॲन्ड डिम्पल ईलेक्ट्रीकल कंपनी सुपरवायझर नितेश कोंडुजी गव्हारे, यांनी 27 ऑगस्ट रोजी भिसी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली की,जांभुळघाट ते खापरीकडे जाणाऱ्या 17 पोल वरील विजेची ॲल्युमिनियम तार कि.अंदाजे 1 लाख,काही दिवसापुर्वी अज्ञात चोराने चोरून नेली.या तक्रारीवरून भिंती पोलीस स्टेशन येथे अपराध क्रं.303(2)भा.न्या.सं. अन्वये अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन वरिष्ठांच्या आदेशाने भिसी पोलीसांनी तात्काळ तपास पथक तयार करून आरोपी व मुद्देमालाचा शोध घेण्यास सुरुवात केली असता, तपासादरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, आनंद गुलाब नेवारे (21)वर्ष,मंगेश निलकंठ बारेकर (24) वर्ष,दोन्ही रा.जांभुळघाट,यांनी काही दिवसांपुर्वी जांभुळघाट परीसरातील ईलेक्ट्रीक सप्लायची ॲल्युमिनियम तारची चोरी केली आहे.
अशा विश्वसनिय माहीतीवरून तपास पथकाने या दोन्ही आरोर्पीना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.तसेच चोरी करण्यासाठी आम्हाला क्रिष्णा रमेश मिटपल्लीवार रा.जांभुळघाट,याने मदत केली.तसेच सदर चोरीचा माल जांभुळघाट येथील रोशन अन्नाजी हजारे व कुणाल गणेश हजारे,यांना विक्री केली.यावरून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असता चोरीची तार विकत घेतल्याची कबुली त्यांनी दिली.सदरची तार आम्ही सागर अन्नाजी हजारे व विजय नंदकिशोर भेंडवाल,दोन्ही रा.जांभूळघाट,यांच्या मदतीने आरोपी कुणाल हजारे,याच्या ईन्ट्रा गाडी क्रं.MH/34/BG/9497, यातून घेऊन गेले आणि जांभूळघाट ते खापरी रोडच्या बाजू असलेल्या जंगली झाडी-झुडपात लपवून ठेवली. पोलिसांनी लपवून ठेवलेला तार कि.अंदाजे 1 लाख,व ईन्ट्रा कंपनीची चारचाकी गाडी किं.अंदाजे 5 लाख,असा एकूण 6 लाखांचा मुद्देमाल जप्त करून 7 आरोपींना अटक करून संबंधित कलमान्वये गुन्ह्याची नोंद केली आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,चिमूर उपविपो. अधिकारी दिनकर ठोसरे,यांच्या मार्गदर्शनात भिसी पोलीस स्टेशन प्रभारी ठाणेदार सपोनि.मंगेश भोंगाडे,पोउपनि. रविंद्र वाघ,पोउपनि.भारत थिटे,पोहवा.अजय बगडे,पोअं. सतिश झिलपे,पोअं.श्रीकांत वाढई, पोअं.रेखलाल पटले, पोअं.वैभव गोहणे,यांनी केली आहे.
#Chandrapur District Crime News.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@