Trafficking of illegal liquor : अवैध देशी-विदेशी दारु वाहतुकीवर कारवाई!| Marathi News..

News@Illigal🥃...

             Chandrapur : मिळालेल्या गोपनीय माहितीवरून गोंडपिपरी पोलिसांनी स्थानिक शिवाजी चौक,येथे नाकाबंदी करून 1 स्विफ्ट डिझायर कारला थांबवून पंचासमक्ष कारची तपासणी केली असता,त्यामध्ये अवैधरित्या देशी-विदेशी दारूचा साठा मिळून आला.सदर प्रकरणी गोंडपिपरी पो.स्टे.येथे संबंधीत कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

     सदर गुन्ह्यातील आरोपी वाहन चालक उमेश विश्वनाथ राजन हिरे वयवर्ष 36 रा.तुकूम चंद्रपूर आणि किसन धोंडोजी चौधरी वयवर्ष 55 रा.जुनोना रोड चंद्रपूर,यांच्या ताब्यातील कारमधून देशी दारु रॉकेट संत्रा 2 पेटया किं.7 हजार,बिअर haywards 5000 च्या 29 नग किं.2600, स्विफ्ट डिझायर कार क्रं.MH/47/C/9684 किं.4 लाख, असा एकूण 4 लाख,9 हजार,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,प्रभारी उपविभा. पोलीस अधिकारी सुधाकर यादव, यांच्या मार्गदर्शनात सपोनि.रमेश हत्तीगोटे,यांच्या नेतृत्वात पोउपनि.कराडे, पोअं.तिरूपती,कडुकर,गव्हारे व सैनिक रियाज,दुर्योधन सर्व पो.स्टे.गोंडपिपरी यांनी केली आहे.

#Crime News...

#Trafficking of illegal liquor...

#Gondpipri Police Action Against illegal Transportation of Country Liquor...

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

-:Advertisement:-