Murder Case Chandrapur : शेतीच्या वादातून मुलाकडून वडिलांची हत्या!|Marathi News.

 News@Murder...

     Chandrapur : शेतीच्या वादातून दारूच्या नशेत मुलाने अवजड शस्त्राने वार करून जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना 23 जून रोजी रात्रीच्या सुमारास चंद्रपूर शहरातील बिनबा वार्ड येथे घडली.ताराचंद उर्फ दारासिंग बाबूसिंग बैस वयवर्ष 62,असे मृतक वडिलाचे तर मुन्ना उर्फ संग्रामसिंग ताराचंद उर्फ दारासिंग बैस वयवर्ष 30,असे आरोपी मुलाचे नाव आहे.

         सदर घटनेतील मृतक वडिलाची वरोरा येथील मोवाडा येथे वडिलोपार्जित शेती आहे.या शेतीबाबत आरोपी मुलगा नेहमी घरात वाद घालत होता.घटनेच्या रात्री 9 ते 11 च्या दरम्यान आरोपी मुलगा घरी दारू पिऊन आला आणि शेतीच्या वादावरून वडिलांसोबत झगडा,भांडण करू लागला.दरम्यान राग अनावर झाल्याने मुलाने घरातील अवजड धारदार शस्त्राने वडीलाच्या तोंडावर,डोक्यावर आणि शरीरातील इतर भागांवर वार करून जागीच ठार केला.

     घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.पंचनामा कार्यवाही करून पुरावे गोळा केले,प्रेत सामान्य रुग्णालयात रवाना करून आरोपीला घटनास्थळा वरून ताब्यात घेतले. आरोपी मुलावर शहर पोलीस स्टेशन येथे अप.क्रं.434/ 2025 कलम 103(1)भा.न्या.सं.अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    सदर गुन्ह्याचा पुढील तपास अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु,नओमी साटम प्रभारी उपिवभागीय पोलीस अधिकारी उपविभाग चंदपूर,यांच्या मार्गदर्शनात पोनि. निशीकांत रामटेके,यांच्या नेतृत्वात सपोनि.राजेंद्र सोनवने व चंद्रपूर शहर पो.स्टे.पथक करीत आहे.

#Chandrapur District Crime News...

#Crime News...

#Chandrapur City Murder Case...

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

-:Advertisement:-