Murder....
Murder Case : बेंगळुरू येथील एका हॉटेलमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे.OYO हॉटेलात एका महिलेची तिच्या प्रियकराने चाकूने 17 वेळा वार करून हत्या केली.सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर धक्कादायक घटना शुक्रवार रोजी रात्री उशिरा घडली. परंतू ती दोन दिवसाने उघडकीस आली.हरिनी वयवर्ष 33, अशी पीडितेची ओळख झाली असून यशस वयवर्ष 25, असे आरोपीचे नाव असल्याचे कळते.दोघेही बेंगळुरूच्या पश्चिम उपनगर केंगेरी,येथील रहिवासी आहे.महिलेचा प्रियकर तिच्यापेक्षा 8 वर्षांनी लहान असून ती महिला विवाहित होती आणि 2 मुलांची आई होती,असे सांगण्यात येत आहेत.
‘ती मैत्री संपवू इच्छित होती पण?'
पूर्णा प्रज्ञा लेआउटमधील OYO हॉटेलच्या खोलीत हरिनीची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. यासंदर्भात सुब्रमण्यपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपास सुरू आहे.डीसीपी दक्षिण लोकेश बी जगलासर(DCP South Lokesh B Jaglasar) म्हणाले,‘सुब्रमण्यपुरा पोलीस स्टेशनला रात्री हत्येची माहिती मिळाली.दोघेही एकमेकांना महिनाभरापासून ओळखत होते.ती स्त्री मैत्री संपवू इच्छित होती आणि त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होती.राग आणि मत्सरातून त्या मुलाने महिलेला चाकूने भोसकून ठार मारले.सध्या आरोपीला अटक करण्यात आली.पुढील तपास सुरू आहे.
#Bangalore Murder...
#Stabbed to Death...
#Accused...
#Beheading...