The Burning Bike : धावत्या दुचाकीने अचानक घेतला पेट!| Marathi News...

News@🔥Bike... 

    Gadchandur : गडचांदूर ते लखमापूरकडे जाताना रेल्वे फाटक पुढील लखमापूर टर्निंगजवळ एका धावत्या दुचाकीने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना 24 जून रोजी रात्री अंदाजे 8 च्या सुमारास घडली.सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून दुचाकीस्वार सुखरुप असल्याचे कळते.दुचाकी पेट घेत असताना दुचाकीस्वाराने दुचाकी रस्त्याच्या कडेला सोडून आपल्या गावी निघून गेला.दरम्यान गडचांदूर पोलीस स्टेशनचे वाहतूक पोलीस रामसिंग पवार यांना सदर घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले.तोपर्यंत दुचाकीने चांगलाच पेट घेतला होता.

दुचाकी पेटत असताना वाहतुकीवर याचे परिणाम होऊ नये याची काळजी घेत वाहतूक पोलीस पवार,यांनी दुचाकी स्वाराची माहिती काढली,त्याला घटनास्थळी बोलवले. अजय मडावी रा.लखमापूर, असे दुचाकीस्वाराचे नाव असून शॉट सर्किटमुळे दुचाकीने पेट घेतल्याची शंका व्यक्त होत आहे.पवार यांनी सदर घटनेसंदर्भात सविस्तर माहिती घेतली,तेव्हा हकीकत सांगताना 'मी गडचांदूरवरून येत असताना अचानक दुचाकी जळायला लागली,मी घाबरलो आणि दुचाकी तिथेच सोडून निघून आलो,माझा जीव वाचला,मला यापुढे तक्रार वगैरे काहीही करायची नाही, जळालेली दुचाकी घरी घेऊन जातो,' असे मडावी यांनी सांगितल्याचे कळते.

 #The Burning Bike... 

#Gadchandur City News...

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

-:Advertisement:-