Road Accident : निर्माणाधीन हायवेवर पुन्हा भीषण अपघात?| Marathi News.

Road Accident News.

           Mother daughter met a tragic end in a bike accident : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा-बल्लारपूर मार्गावर हल्ली राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे.या निर्माणाधीन महामार्गावर एका अज्ञात ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली.या धडकेत राजुरा येथील एका माय-लेकीचा जागीच मृत्यू झाला.सदर दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.या राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर परिसरातील नागरिकांकडून तीव्र रोष व्यक्त होत आहे.राजुरा येथील ज्योती बंडू रागीट(42)व त्यांची मुलगी सेजल बंडू रागीट,हे दोघीही MH/34/BN/5538 क्रमांकाच्या दुचाकीने राजुरा येथून बल्लारपूरकडे जात असताना वर्धा नदीचा पुल ओलांडल्यावर जलाराम बाप्पा मंदिराजवळ अद्यात ट्रकने दुचाकीला धडक दिली.यामध्ये माय-लेकीचा जागीच मृत्यू झाला.अशी माहिती मिळत आहे. 

      घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतांचे शव शवविच्छेदनासाठी पाठवला.बामणी-राजुरा ते आदिलाबाद या राष्ट्रिय महामार्गाचे विस्तारीकरणाचे काम सूरू आहे.रस्त्याची उंची वाढविण्यासाठी मातीचे ढिगारे टाकण्यात आले.याठिकाणी कुठल्याही प्रकारचे ठोस नियोजन नसल्याने या धिगाऱ्यावरील माती रस्त्यावर येत आहे.पावसात घसरून तर पाऊस नसताना प्रचंड धुळीचे साम्राज्य याठिकाणी बघायला मिळत आहे.नुकत्याच झालेल्या पावसामुळे भर रस्त्यात चिखल होऊन अनेकांना जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करावा लागला.या मार्गावरून नेहमीच प्रवशांना तारेवरची कसरत करावी लागत असून वेळीच योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.अन्यथा अनेकांना प्राणाला मुकावे लागणार असल्याची भिती प्रवाशी व्यक्त करीत आहेत.

#Road Accident News.

#Mother Daughter met a Tragic end in a Bike Accident.

#Chandrapur District Accident.

#Under Construction Highway.

                                       ----------)(-----------:Advertisement:-