Rajura : पोलीस स्टेशन हद्दीतील रमाबाई वार्डातील 53 वर्षीय कविता रायपूरे नामक महिला एकटी आपल्या घरी झोपलेली असतांना मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने घरात प्रवेश केला आणि धारदार शस्त्राने डोक्यावर वार करून तिची हत्या केली.सदर धक्कादायक घटना 15 जून रोजी घडली होती.याची तक्रार राजुरा पोलीस स्टेशन येथे दाखल करून संबंधित कलमान्वये अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, यांनी घटनास्थळाला भेट देवून गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी LCB चंद्रपूर व गुन्हे प्रकटीकरण शाखा राजुरा, यांना आदेश दिले होते.यानुसार घटनास्थळ परीसरातील 15 ते 20 ठिकाणावरील CCTV फुटेज तपासण्यात आले. जवळपास 40 ते 50 संशयीतांची कसून चौकशी करण्यात आली.सलग 6 दिवस पोलीस आरोपीचा शोध घेत होते. दरम्यान गुप्त बातमीदार व तांत्रीक पुराव्यांच्या आधारे तपास करून रमाबाई नगर येथील एक 17 वर्षीय विधी संघर्ष(अल्पवयीन)बालक दुसऱ्या गावी होता.त्याच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून बोलावले आणि विश्वासात घेवून त्याची सखोल विचारपूस(चौकशी)केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबूली दिली. गुन्ह्यात वापरलेला हत्यार (कोयता)हस्तगत करून त्याला ताब्यात घेण्यात आला आहे.कोणताही पुरावा नसतांना सदर गुन्ह्यातील गुन्हेगाराचा शोध लावणे? मोठे आव्हान पोलिसांपुढे होता. मात्र,शेवटी त्या खुन्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
"कशामुळे घडली घटना?"
मृतक कविता रायपुरे,ही महिला घरी किराणा दुकान चालवत होती,परीसरातील नागिरक किराणा सामान खरेदीसाठी तिच्याकडे येत होते.सिगारेटच्या आहारी गेलेला एक अल्पवयीन मुलगा दररोज रायपूरेंच्या दुकानात सिगारेटसाठी येत होता.दरम्यान उधारी जास्त झाल्याने रायपूरे,या मुलाकडे पैश्याची मागणी करीत होत्या. पैश्यासाठी हटकत असल्याचा राग मनात धरून घटनेच्या दिवशी एकटी असल्याचे पाहून या मुलाने मध्यरात्री घरी प्रवेश केला आणि कोयत्याने वार करून खून केला.आणि फरार झाला.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु,उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव राजुरा,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुमीत परतेकी,यांच्या नेतृत्वात मसपोनि. निशा भुते,सपोनि.हेमंत पवार,गुन्हे प्रकटीकरण शाखाचे पोउपनि.पांडूरंग हाके,पोउपनि.भिष्मराज सोरते,पोउपनि. गोविंद चाटे,सफौ.किशोर तुमराम,पोहवा.विक्की निर्वाण, पोअं.महेश बोलगोडवार,पोअं.शफ़ीक शेख,पोअं.शरद राठोड,पोअं.अविनाश बांबोळे,पोअं.आनंद मोरे,यांनी केली आहे.
#Chandrapur District Apdate...
#Rajura Murder Case...
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@