Shocking Incident : Farmer's son dies in Chandrapur District!| Marathi News...

News@Shocking...

    Korpana : खरीप हंगाम सुरु झाल्याने शेतकरी शेताच्या विविध कामात व्यस्त आहे.याच श्रेणीत शेतात काम करताना जमिनीवर तुटून पडलेल्या जिवंत वीज तारेच्या स्पर्शाने एका शेतकरी पुत्राचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कोरपना तालुक्यातील सावलहिरा गावी 25 जून रोजी घडली आहे.आनंद जोगी वयवर्ष अंदाजे 20,असे मृत तरूणाचे नाव असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

         सदर घटनेची माहिती मिळताच,संबंधीत तलाठी,मंडळ अधिकारी,पोलीस कर्मचारी व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कोरपना ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.पुढील तपास कोरपनाचे ठाणेदार,यांच्या मार्गदर्शनात सुरू आहेत.

            "कंत्राटदाराचा हलगर्जीपणा कारणीभूत?"

    महावितरणच्या कंत्राटदारांनी 15 दिवसांपुर्वीच शेतातून विद्युत खांब टाकले होते.सदर खांब 2 फूटाच्या खड्ड्यात टाकले.त्यामध्ये व्यवस्थित सिमेंट काँक्रेट सुद्धा भरले नाही, अत्यंत निकृष्ट दर्जाच्या कामामुळे विद्युत खांब जमीनीवर कोसळले आणि दुर्दैवाने ही घटना घडली.असे खळबळजनक आरोप नागरिकांनी केले आहे.सदर घटनेने नागरिकांमध्ये रोष असून महावितरणने नुकसानभरपाई द्यावी,संबंधीत कंत्राटदारावर कारवाई करावी,अशी मागणी नागरीक करताना दिसून आले.आता महावितरण अधिकाऱ्यांच्या भुमिकेवर लक्ष लागले आहेत. 

#Shocking Incident 

#Farmer's Son Dies after Touching a Broken Electric  Wire.

       @@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

-:Advertisement:-