Chandrapur : स्थानिक गुन्हे शाखा(LCB)चे पथक 5 जुलै रोजी जिल्ह्यात गुन्हेगार शोध मोहीम राबवीत असतांना पेट्रोलींग दरम्यान रेकॉर्ड वरील दोन गुन्हेगार नामे अतुल उर्फ मुजोर विकास राणा वयवर्ष 26,रा.भगतसिंग वार्ड बंगाली कॅम्प चंद्रपूर आणि ऋषेश उर्फ कोब्रा चंद्रभान आत्राम वयवर्ष 24,रा.विसापूर,या दोघांनी बल्लारपूर पोस्टे हद्दीत घरफोडी केल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने LCB पथकाने दोन्ही गुन्हेगारांना ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्यांनी पो.स्टे.बल्लारपूर व रामनगर हद्दीत घरफोडीचे तीन गुन्हे आणि राजुरा हद्दीत एक बाईक चोरीच्या गुन्ह्याची कबूली दिली.
त्यांच्याकडून सोन्याचे मंगळसुत्र,एक चेन,दोन आंगठी, रेडमीचा एक मोबाई,रोख 400, होंडा शाइन बाईक क्रं. MH/34/X/5159,किं.अंदाजे 40 हजार,असा एकूण 1 लाख,93 हजार,400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून सदर आरोपींना बल्लारपूर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि.दिपक कांक्रेडवार,सपोनि.बलराम झाडोकर, पोउपनि.संतोष निंबोरकर,पोउपनि.सर्वेश बेलसरे,पोहवा जयसिंह,गणेश मोहुर्ले, नापोअं संतोष येलपुलवार, पोअं नितीन रायपुरे,मिलींद जांभुळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे.
#Action by Local Crime Branch Chandrapur...
#Chanrapur District Crime News...
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@