Ballarpur : पोलीस 26 जून रोजी पेट्रोलिंगवर असताना गोपनीय माहिती मिळाली की,चंद्रपूर ते बामणी-बल्लारपूर रोडवरून एका चारचाकी वाहनाद्वारे अवैधरित्या दारूची वाहतूक होणार आहे.या माहितीवरून बल्लारपूर पोलिसांनी स्थानिक नगर परिषद चौक येथे,नाकाबंदी करून साधारणत: सायंकाळी 5,25 वाजता,सिल्वर रंगाची Hyundai कारला थांबवून पाहणी केली असता सदर कारमध्ये सुनील महादेव मेश्राम रा. शिवाजी वार्ड बल्लारपुर व श्रीनिवास चंद्रया भीमगणी रा.बाबपेठ चंद्रपूर,ही व्यक्ती मिळून आली.त्यांच्या समवेत पंचासमक्ष वाहनाची झडती घेतली तेव्हा,सदर कारमध्ये 20 नग खरड्याच्या खोक्यात रॉकेट संत्रा कंपनीच्या 90 ML देशी दारू,35 रु.प्रमाणे 70 हजार,500 नग रॉकेट संत्रा कंपनीच्या 90 ML देशी दारू, 35 रु.प्रमाणे 17 हजार 500,दोन विवो कंपनीचे अँड्रॉईड मोबाईल फोन किं.10 हजार,Hyundai कार नंबर MH/34 /AM/9673 किं.3 लाख,असा एकूण 3 लाख,95 हजार 500 रूपये कींमतीचा मुद्देमाल जप्त करून स़बंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु,प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव,यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार बिपीन इंगळे,यांच्या नेतृत्वात सपोनि.मदन दिवटे,पोउपनि.अभिषेक जंगमवार, सफौ.आनंद परचाके,पोअं.सत्यवान कोटनाके,संतोष दंडेवार,संतोष पंडीत,सुनील कामतकर,प्रविण निकोडे, मोहन निषाद,पोअं.विकास जुमनाके,शरदचंद्र कारूष, वशिष्ठ रंगारी,मिलींद आत्राम,खंडेराव माने,लखन चव्हान, गुरु शिंदे,सचिन राठोड,भास्कर चिचवलकर,मपोअं.अनिता नायडू,चामपोअं.विना येलपुलवार इत्यादींनी केली आहे.
#Crime News...
#Trafficking of illegal liquor...
#Ballarpur Police Action Against illegal Transportation of Country Liquor.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@