Chandrapur-Rajura : गडचांदूर-राजुरा राष्ट्रीय महामार्गावरील नाईकनगर गावाजवळ एका कार आणि बाईकच्या अपघातात बाईकस्वार 2 तरूण गंभीर जखमी झाले.उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्याची प्रकृती गंभीर आहे.सदर घटना 3 जून मंगळवार रोजी सायंकाळी अंदाजे 7,30 च्या सुमारास घडली.मृतक उमेश रामदास लेंगूरे वयवर्ष 41 मूल तालुक्यातील चिरोली गावाच्या रहिवासी तर लंकेश कैलास मानकर वयवर्ष 37, हा कढोली खु.येथील रहिवासी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,हे दोघेही गडचांदूरहून राजुराकडे बाईकने जात होते.त्यावेळी एका भरधाव कार क्रं.MH/29/ BC/0568,ने त्यांच्या बाईकला धडक दिली.या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुमित परतेकी पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना राजुरा ग्रामीण रुग्णालयात पाठवला.त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे पाहून त्यांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले.दरम्यान पुढील उपचारासाठी उमेशला नागपूरला नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.राजुरा पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
#Car and two-wheeler Accident..
#One dead,One Injured..
#Gadchandur-Rajura National Highway...