Pregnant Woman Torture : घरासमोर मंच्युरियनचे स्टॉल लावण्यावरून झालेल्या वादात आरोपींनी एका गर्भवती स्त्रीच्या पोटावर लाथा-बुक्यांनी मारहाण केल्याने पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात दोन दिवसांपूर्वी घडली आहे.सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी 6 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा सचिन लोणारकर वयवर्ष 29,असे पिडीत महिलेचे नाव आहे.तर आरोपींमध्ये राकेश मरस्कोल्हे,ममता मरस्कोल्हे,गोलू मरस्कोल्हे यांच्यासह इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
"नेमका प्रकरण काय."
पिडीतेचा पती आरोपींच्या घरासमोर मंच्युरियन(चायनीज) चे स्टॉल लावत होता.आरोपीने स्टॉल लावण्यासाठी रोखले पण,सचिनने ऐकले नाही.यामूळे घटनेच्या रात्री 8.30 च्या सुमारास त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले.पतीला मारहाण सुरू असल्याचे पाहून पत्नी पुजा पतीला वाचवण्यासाठी गेली असता,आरोपींनी तिलाही लाथा-बुक्यांनी जबर मारहाण केली.या मारहाणीत पुजाच्या पोटाला लाथ लागल्याने तिला असाह्य वेदना होऊ लागल्या लगेच तिला ब्रह्मपूरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र,डॉक्टरांनी पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याचे सांगितले.पूजाच्या तक्रारीवरून पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध संबंधीत विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.आरोपीच्या तक्रारीवरून पूजाचा पती सचिन विरुद्धही मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सुरू आहे.
#Chandrapur District Crime News...
#Pregnant Woman Torture...