Gadchandur : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,यांचे विकासात्मक धोरण व कुशल नेतृत्वाला तसेच राजुरा विधानसभेचे तडफदार आमदार देवरावदादा भोंगळे,यांचा विकासाचा झंझावात व सर्वांना सोबत घेऊन सुरू असलेल्या वाटचालीला प्रभावीत होऊन तळोधी येथे विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीररीत्या प्रवेश घेतला.आमदार देवरावदादा भोंगळे यांनी सर्वांना पक्षाचा दुपट्टा घालून सन्मानपूर्वक पक्षात स्वागत केले.
''सबका साथ,सबका विकास,सबका सन्मान,याप्रमाणे पक्षात सन्मानाची वागणूक दिली जाईल,कोणत्याही जनहिताच्या कामात,काही अडचण येत असेल तर,अर्ध्या रात्री संपर्क करावा,भाजप पक्ष सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे." अशी विश्वासात्मक ग्वाही आमदार देवरावदादा भोंगळे यांनी यावेळी दिली. 'एकीकडे अवकाळीचा तडाखा तर दुसरीकडे पक्षप्रवेशाचा धडाका!' विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह भरपावसात तळोधी येथील कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात भाजपमध्ये प्रवेश केला.
"यांनी केला भाजपमध्ये प्रवेश."
प्रतम नवले,ऋषी ताजने,सुभाष माणुसमारे,पवन गोखरे, वैभव गोहोकार,प्रशांत जेनेकर, संतोष येसेकर,चंपत खेवले,सागर ताजने,प्रविण तिखट,प्रभाकर ताजने,किशोर दोरखंडे,शुभम लखमापुरे,खुशाल घोटेकर,नानाजी ठावरी, सौरभ झाडे,बाबाराव मत्ते,संबाशिव जम्बे,नितीन गोहकार, संदीप उरकुडे,नत्थु जुलमे,शंकर जम्बे,रमेश ताजने,ज्ञानेश्वर भटवलकर,संकेत कुबडे,सोमेश्वर मडकाम,प्रविण समर्थ, अतुल ताजने,मोहन लखमापुरे,ऋषी कुबडे,संजय इसनकर,मधुकर गोहकार,गोरखनाथ लांडगे,अमोल पाचभाई,अतुल पाचभाई,मोतीराम गोहकार,कवडू ताजने, देवराव लखमापुरे,इतरांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला.
"पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजक."
बालाजी(अनील)संकुलवार,मंगेश,प्रशांत जेनेकर,प्रितम नवले,अमोल पाचभाई,सुनील खांडेकर,कवडू ताजने, केशव जेनेकर,पवन गोखरे,निर्दोष गोखरे यांनी सदर पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन केले होते.दरम्यान विशाल विरूटकर यांची कृषी अधिकारी आणि शंभर जम्बे यांची पोलीस अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या हस्ते त्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.सदर सोहळ्यात तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
"भाजपमध्ये इन्कमिंगची मालिका सुरूच."
'एकच वादा,देवराव दादा,विकासाचा वादा,देवराव दादा' हे ब्रिद वाक्य लक्षात घेऊन तळोधी पाठोपाठ राजुरा विधानसभेतील इतर शहर,गावातील विविध पक्षांचे कार्यकर्ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.भविष्यात काय घडते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार हे मात्र विशेष!
#Bharatiya Janata Party...
#Political Explosion in Talodhi...
#MLA Devraodada Bhongle...
----------)(----------