Gadchandur : पालगाव रस्त्यासाठी राजुरा विधानसभेचे धडाकेबाज आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या नेतृत्वात 3 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची अखेर 25 जून रोजी सांगता झाली.आ.भोंगळे यांच्या मध्यस्थीनंतर कंपनी प्रशासन प्रतिनिधींमध्ये सकारात्मक चर्चा झाली.यामध्ये येत्या 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पालगाव रस्त्याचे काम पूर्ण करून देण्याचे लेखी आश्वासन कंपनीकडून देण्यात आले. याचबरोबर आंदोलनात सहभागी झालेल्या कोणत्याही कामगारावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही? असे आश्वासन सुद्धा कंपनी प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत. "काय म्हणाले आ.दादा."
सदर आंदोलनाच्या समाप्तीनंतर आमदार देवरादादा भोंगळे म्हणाले की,"कामगारांच्या हितासांठी आम्ही सदैव कटीबद्ध आहोत.जनतेचा सेवक म्हणून या लढ्याला पाठींबा दिला आणि पुढेही देत राहणार.कामगारांचा संयम आणि एकजूट हेच या यशस्वी आंदोलनाचे खरे कारण आहे."
"पुन्हा आश्वासनच?"
पालगाव वासीयांना रस्ता मिळावा यासाठी आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या नेतृत्वात सलग 3 दिवस भव्य आंदोलन झाले.या दरम्यान दादांनी घेतलेली ठाम भूमिका आणि सक्रिय मध्यस्थीनंतर कंपनी प्रशासनाने येत्या 30 सप्टेंबर 2025 पर्यंत रस्ता बनवून देण्याचे लेखी आश्वासन दिले.मात्र,यापुढे सुद्धा अशाच प्रकारचे लेखी आश्वासन कंपनी प्रशासनातर्फे देण्यात आले होते.परंतू,आश्वासन पाळले नाही.परिणामी पुन्हा आंदोलन उभारण्यात आले. यावेळी पुन्हा एकदा कंपनीकडून आश्वासनाची खैरात वाटण्यात आल्याची चर्चा ऐकायला मिळत असून, आतातरी आश्वासनाची पुर्तता होते की,पुन्हा आंदोलन उभारण्यात येते? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
#Once Again Promise Only...
#UltraTech Cement Awarpur...
#MLA Devraodada Bhongle News...
#Korpananewsapdate...
#Gadchandur...
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
-:Advertisement:-