Ballarpur : पोलीस 26 जून रोजी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींगवर असतांना खबर मिळाली की,पेपर मिल 3 एक्का गेट परिसरात एक पांढरऱ्या रंगाची शिफ्ट कार उभी असून,तिथे 3 अज्ञात इसम आरडा ओरड करीत आहे.या माहीतीवरून पेट्रोलींगवर असलेले अधिकारी,कर्मचारी पंचासह 3 एक्का गेटजवळ पोहोचले.तेव्हा त्याठिकाणी 3 इसम आरडा ओरड करीत असल्याचे मिळून आले.तेव्हा नाव विचारले असता,त्यांनी चंद्रभूषण राजदेव चव्हाण,रवि प्रभाकर दोडके दोन्ही रा.चंद्रपूर,योगेश बंडुजी कुडकेलवार रा.बामणी बल्लारपूर,असे सांगून तेथे आरडा ओरड करण्याचे कारण विचारले असता,त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.त्यामुळे त्यांच्यावर संशय आल्याने पंचासमक्ष त्यांच्या कारची झडती घेतली असता त्यामध्ये एक धारदार लोखंडी तलवार मिळून आली.पोलिसांनी 3 आरोपीसह एक पांढऱ्या रंगाची शिफ्ट कार क्रं.MH/34/AM/0134 व तलवार ताब्यात घेवून तिन्ही आरोपींविरुद्ध संबंधीत कलमान्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.पुढील तपास पोहवा.सुनिल कामतकर करीत आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक तथा प्रभारी पोलीस अधीक्षक रिना जनबंधु,प्रभारी उपविभागिय पोलीस अधिकारी(राजूरा) सुधाकर यादव,यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार बिपिन इंगळे,यांच्या नेतृत्वात सपोनि. मदन दिवटे,पोउपनि.अभिषेक जंगमवार,सफौ.आनंद परचाके,सत्यवान कोटनाके,संतोष दंडेवार,संतोष पंडीत, सुनिल कामतकर,पोअं.विकास जुमनाके,शरदचंद्र कारूष, वशिष्ठ रंगारी,मिलींद आत्राम,खंडेराव माने,लखन चव्हान, गुरु शिंदे,सचिन राठोड,भास्कर चिचवलकर,मपोअं.अनिता नायडू,चामपोअं.विना येलपुलवार इत्यादी पो.स्टाफ यांनी केली आहे.
#Chandrspur District Crime news...
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@