Gadchandur : राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय, दमदार,धडाकेबाज आमदार देवरावदादा भोंगळे,यांनी आपल्या कार्यशैलीने अख्ख्या विधानसभा क्षेत्रात विविध विकास कामांचा झंझावात निर्माण केला आहे. जनसामान्यांचे प्रश्न तात्काळ सुटावे,यासाठी ते नेहमी प्रयत्नशील नेहमी असतात.त्याचमुळे दररोज सकाळी ते आपल्या जनसंपर्क कार्यालयात 'जनता दरबार' भरवीत असतात.तळागाळातील नागरिकांचे प्रश्न सुटावे,यासाठी आ.देवरावदादा भोंगळे,हे राजुरा विधानसभा क्षेत्रात प्रथमच अभिनव उपक्रम राबवित 'आमदार आपल्या दारी' गाव भेट दौऱ्याचे नियोजन कोरपना तालुक्यातील गावात केलेले आहेत.
सदर अभिनव उपक्रमात ग्रामसेवक,मंडळ अधिकारी, तलाठी,कृषी विभाग,बांधकाम विभाग,आरोग्य विभाग,वन विभाग,विद्युत वितरण विभाग,पोलीस स्टेशन,ग्रामीण पाणी पुरवठा विभाग इत्यादी विभागाच्या संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहे.आज 28 जून रोजी कोरपना तालुक्यातील नारंडा माथा,शेरज(खुर्द), शेरे(बू),हेटी,कोडशी(खुर्द),तांबाडी,कोडशी(बू),गांधीनगर, तुळशी इत्यादी गावांचा समावेश आहे.तरी या उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहेत.
#Aamdar aplya dari...
#Rajura Vidhansabha MLA Launched 'Aamdar Aaplya Dari' to address Taluka level issued...
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@