Gadchandur : राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय, दमदार आमदार 'देवराव भोंगळे' यांनी आपल्या काम करण्याच्या कार्यशैलीने संपूर्ण विधानसभा क्षेत्रात कामाचा झंझावत निर्माण केला आहेत.जनसामान्य माणसाचे प्रश्न तात्काळ सुटावे,हा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो.ते दररोज सकाळच्या सुमारास आपल्या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार भरवीत असतात. तळागाळातील नागरिकांचे प्रश्न सुटावे,यासाठी आ.भोंगळे,यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रात प्रथमच अभिनव उपक्रम राबवित 'आमदार आपल्या दारी' गाव भेट दौऱ्याचे नियोजन कोरपना तालुक्यातील गावांमध्ये केले होते.त्यांनी सदर दौऱ्याची सुरवात 'नारंडा' गावातून केली आहेत.Aamdar Aplya Dari...
यामध्ये कोरपना तालुक्यातील तहसीलदार,गट विकास अधिकारी,पोलीस निरीक्षक,ग्रामसेवक,मंडळ अधिकारी, तलाठी,कृषी विभाग,बांधकाम विभाग,आरोग्य विभाग,वन विभाग,विद्युत वितरण विभाग,पोलीस स्टेशन,ग्रामीण पाणी पुरवठा विभाग,इत्यादी विभागाचे संबंधीत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी नागरिकांच्या विकास व समस्यासंदर्भात प्रश्न सोडविण्यात आले आहेत.यामध्ये 28 जून रोजी कोरपना तालुक्यातील नारंडा,माथा,शेरज खुर्द, शेरज(बू.),हेटी,कोडशी खुर्द,तांबाडी,कोडशी(बू.),गांधीनगर इत्यादी गावाला भेट दिली.यावेळी गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
#Aamdar Aplya Dari...
#MLA Devraodada Bhongle News...
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@