News@Crime...
Pune,Daund crime news : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात.अशातच दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली इथे आईनेच आपल्या अडीच वर्षांच्या मुलीची आणि एक वर्षाच्या मुलाची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.2 मुलांचा खून केल्यानंतर या महिलेने नवऱ्याच्या मानेवर आणि डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. घरगुती वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.जन्मदात्या आईनेच पोटच्या 2 मुलांचा खून केल्याने सर्वत्र या घटनेबाबत शोक व्यक्त केला जात आहे.
नवऱ्यावर जीवघेणा हल्ला.
मुलगी पिऊ दुर्योधन मिंढे(वय वडीच वर्षे),मुलगा शंभू दुर्योधन मिंढे(वय 1 वर्ष)अशा 2 चिमुकल्यांच्या गळा दाबून खून केला.यानंतर नवरा दुर्योधन बाळासाहेब मिंढे यांच्या मानेवर आणि डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले.यामध्ये दुर्योधन बाळासाहेब मिंढे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे.
आईने केली मुलांची हत्या.
जन्मदात्या आईनेच 2 मुलांची झोपेत असतानाच हत्या केली.एवढ्यावरच न थांबता तिने धारदार शस्त्र घेऊन नवऱ्यावर वार केले.ही घटना 8 फेब्रुवारी शनिवार रोजी पहाटे 5 ते 6 च्या सुमारास घडली.याप्रकरणी दुर्योधन यांची पत्नी कोमल दुर्योधन मिंढे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.घटनेची माहिती मिळताच दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस,दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार,सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.
घरगुती भांडणातून प्रकरण घडला.
"आज सकाळी 5 ते 6 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.जन्मदात्या आईने लहान मुलीचा आणि मुलाचा खून केला.यानंतर आरोपी महिलेस ताब्यात घेतले आहे.ही घटना घरगुती भांडणातून घडल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न होत आहे. तरी,आम्ही पुरावे गोळाकरून त्या पद्धतीने तपास करत आहोत" अशी माहिती दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
#Daund crime news...
#Crime News...
#Mata Na Tu Vairini...