Anti Corruption Bureau Chandrapur : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर...

News@ACB...

Chandrapur : नागभीड तालुक्यातील वाढोणा ग्राम येथील समाजसेवा विद्यालयातील कनिष्ठ लिपिक मोहम्मद अकील इस्माईल शेख,याला 5 हजाराची लाच घेताना (ACB) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.या लिपिकाने एका सेवानिवृत्त मुख्याध्यापकाला 15 हजारची लाच मागितली होती.त्यातील पहीला टप्पा म्हणून 5 हजाराची लाच घेताना सदर लिपीकाला ACB ने अटक केली आहे.

    याबाबत सविस्तर असे की,यातील तकारदार मौजा नागभीड येथील रहिवासी असून ते 'समाजसेवा विद्यालय' वाढोणा ता.नागभीड जि.चंद्रपूर,येथून मुख्याध्यापक पदावरून गेल्या 2022 मध्ये सेवानिवृत्त झाले.यांना सेवानिवृत्ती नंतर सेवाकालावधी दरम्यान जमा असलेले अर्जीत रजेच्या नोंदी प्रमाणीत करण्यासाठी कवरींग पत्र लेखाधिकारी शिक्षण विभाग चंद्रपूर,यांच्याकडे पाठवण्यासाठी सदर विद्यालयातील लिपीक मोहम्मद अकील इस्राईल शेख वयवर्ष 54,यांना संपर्क केला असता त्यांनी काम करून देण्यासाठी 15 हजार रुपये लाचेची मागणी केली.परंतू सेवानिवृत्त मुख्याध्यापकांना लाचेची रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी 6 ऑगस्ट रोजी थेट चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.सदर तकारीवरून 7 ऑगस्ट रोजी दिलेल्या तकारीची गोपनीयरित्या शहानिशा करून पडताळणी/सापळा कारवाईचे आयोजन करण्यात आले.कनिष्ठ लिपीक शेख यांनी त्या कामासाठी 15 हजाराची मागणी केली होती. मात्र,तडजोडीअंती पहिला हप्ता महणून 5 हजार व काम पुर्ण झाल्यानंतर 10 हजार,असे ठरले. 

     त्यावरून आज 8 ऑगस्ट रोजी तक्रारदार मुख्याध्यापक यांनी लाचेची रक्कम घेवून मौजा वाढोणा चौक येथील एका टि स्टॉलवर लिपिक शेख यांना 5 हजार रुपये दिले.दरम्यान ती रक्कम स्वीकारून लिपिकाने त्याच्याजवळ उभे असलेले श्रीकृष्ण परसराम शेडे वयवर्ष 34 रा. वाढोणा ता.नागभीड जि.चंद्रपूर,या खाजगी इसमाकडे दिले असता दोन्ही आरोपींना ACB ने ताब्यात घेतले,पुढील तपास कार्य सुरू आहे.सदरची कार्यवाही राहुल माकणीकर पोलीस अधीक्षक ला.प्र.वि.नागपूर,संजय पुरंदरे अप्पर पोलीस अधीक्षक ला.प्र.वि.नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्रीमती मंजुषा भोसले पोलीस उपअधीक्षक लाप्रवी कार्यालय चंद्रपूर,यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जितेन्द्र गुरनुले,पोहवा नरेश नन्नावरे,पोशी राकेश जांभळकर,अमोल सिडाम,मपोशी मेघा मोहुर्ले,चालक पोह.रवि तायडे यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.    

                  'नागरिकांना आवाहन'

   सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट)यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी केल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.असे आवाहन चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आले आहे.

#Action of Anti-Corruption Department Chandrapur...

#Arrested While Accepting a Bribe of 5 Thousand...

     🔹🔻🔹🔻🔹🔻🔹🔻🔹🔻🔹🔻🔹