Ration Shopkeeper News : रेशन दुकानदार आणि ग्राहक...

News@Demand...

  Gadchandur : राज्य शासनाची स्वस्त धान्य पूरवठा योजना,ही गोरगरीब गरजू लोकांसाठी लाभदायक व फायदेशीर असली तरी लाभार्थ्यांना याचा लाभ घेणं त्रासदायक ठरत आहे.पूर्वी स्वस्त धान्य दुकान चालवणे,ही जबाबदारी वाटायची.गरिबांना धान्य देण्याचे काम पुण्याचे आहे,असे अनेक रेशन दुकानदार मानायचे.पोत्यांनी भरलेली खोली,एका कोपऱ्यात टेबल टाकून बसलेला दुकानदार, जवळच तराजू टांगलेला,भिंतीवर धान्याच्या दरांची पाटी आणि उन,वारा,पावसाच्या मारा सहन करत दुकानाबाहेर आजूबाजूला घोळका करून बसलेले ग्राहक.हे चित्र आजही पाहायला मिळत आहे.काळानुसार स्वस्त धान्य पुरवठा व इतर क्षेत्रात आमुलाग्र बदल घडल्याचे पहायला मिळत असताना कित्येक ठिकाणी आजही ग्राहकांना पाण्या पावसात भिजत,उन्हाचे चटके सहन करत रेशन दुकानापुढे तात्कळत उभं राहावं लागत आहे.तसेच बाथरूमची सुद्धा व्यवस्था असणे गरजेचे असून यामध्ये विशेषतः महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.ही बाब लक्षात घेऊन गडचांदूरसह तालुक्यातील इतर रेशन दुकानदारांनी आपल्या दुकानापुढे ग्राहकांना निवांत बसण्यासाठी शेड,शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी,अशी मागणी गडचांदूर शेतकरी संघटनेचे शहर सरचिटणीस तथा माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष पटकोटवार,यांनी कोरपना तहसीलदाराकडे निवेदनातून केली आहे.

    काही ठिकाणी रेशनचे लाभ घेणारी महिला व पुरूष,यांना नंबर येईपर्यंत सावलीत बसण्याची व उभे राहण्याची सोय नसल्याने,त्यांना रहदारीच्या रस्त्यावर उन्हात व पावसात भिजत रेशनचा लाभ घ्यावा लागत आहे.महिला व पुरुष आपली महत्त्वाची कामे बाजूला ठेऊन याठिकाणी येतात.परंतू,काही रेशन दुकानापुढे बसण्याची तर सोडाच उभं राहण्याची व्यवस्था उपलब्ध नाही.मोठा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र असून रेशन दुकानदारांनी ग्राहकांसाठी शेड,शुद्ध पाण्यासह बाथरूमची सुद्धा व्यवस्था करण्याचे आदेश द्यावेत.जे दुकानदार ही व्यवस्था देण्यासाठी इच्छुक नसेल,अशा रेशन दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी पटकोटवार यांनी तहसीलदार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनातून  केली आहे.सदर मागणी जनहिताची असून आता याविषयी तहसीलदार केव्हा आणि काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

#Ration Shopkeeper News...

     🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹