News@Accident...
Brahmapuri : स्विफ्ट डिझायर कार पलटी झाल्याने एकाचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना ब्रम्हपूरी तालुक्यातील बाळापूर रस्त्यावरील शिवसागर तुकुम रस्त्यावर आज घडली आहे.प्राप्त माहितीनुसार पटेल नगर ब्रम्हपूरी, येथील 29 वर्षीय कार चालक चेतन पटेल,हे शुभम मैद व मुकेश सरकार{दोघेही रा.ब्रम्हपूरी},या मित्रांसह स्विफ्ट डिझायर कार क्रं.MH/34/K/8254,या वाहनाने जात असताना चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार रस्त्याच्या बाजूला एका झाडाला धडकून पलटी झाली.यामध्ये मुकेश सरकारचा जागीच मृत्यू झाला तर शुभम मैद व चेतन पटेल,हे दोघे गंभीर जखमी झाले.सदर घटनेत दोषी असलेल्या कार चालक चेतन पटेलवर संबंधीत कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती असून घटनेचा पुढील तपास ब्रह्मपूरी पोलीस करीत आहे.
#One Dead and Two Seriously Injured in a Car Accident...
#Swift Dezire Car Overturned...