News@Korpanalive...
Actress Seema Dev : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे आज 24 ऑगस्ट 2023 रोजी दुःखद निधन झाले त्या 81 वर्षांच्या होत्या.सीमा देव यांच्या जाण्याने मराठी तसेच हिंदी सृष्टीला मोठा धक्का बसला आहे.सीमा देव या पूर्वाश्रमीच्या नलिनी सराफ होत्या.बालपण मुंबईतच गेलेल्या नलिनी सराफ यांना नृत्याची विशेष आवड होती.वडिलांचे छत्र हरवल्याने आईला मदत म्हणून आणि भावंडांचे संगोपन व्हावे,म्हणून त्यांनी चित्रपटातून नृत्य सादर करण्यास सुरूवात केली होती.'आलिया भोगासी' हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट.या पहिल्याच चित्रपटातून त्या 'रमेश देव' यांच्या बहिणींच्या भूमिकेत झळकल्या होत्या.त्यानंतर 'पडछाया' चित्रपटात त्या रमेश देव यांच्या सोबत मुलीच्या भूमिकेत दिसल्या. 'ग्यानबा तुकाराम' या चित्रपटात दोघेही पुन्हा एकत्र झळकले होते. 'यंदा कर्तव्य आहे,माझी आई,सुवासिनी, मोलकरीण,पाहू रे किती वाट' अशा चित्रपटात त्या महत्वपूर्ण भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या.'सालस,सोशिक' अशा बहुढंगी भूमिकेतून सीमा देव यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती.'जगाच्या पाठीवर' चित्रपटात त्या आंधळ्या मुलीच्या भूमिकेत दिसल्या.आनंद सारख्या हिंदी चित्रपटातही त्या आपल्या अभिनयाचा ठसा उमटवताना दिसल्या.सीमा देव गेल्या काही वर्षांपासून 'अल्झायमर' Alzheimer या आजाराने त्रासलेल्या होत्या.रमेश देव हयातीत असतानाही त्या त्यांना ओळखत नव्हत्या.रमेश देव यांचे निधन झाले,हेही त्यांना ठाऊक नव्हते. आपल्या मुलांना,सुनानाही त्या ओळखत नसत.त्यामुळे अशा दिवसांत मुलगा 'अजिंक्य देव' आपल्या आईची योग्य ती काळजी घेत असे.रमेश देव आणि सीमा देव,यांचा प्रेमविवाह होता.कोल्हापूरात या दोघांच्या लग्नाला खूप गर्दी जमली होती.त्यामुळे त्यांचे हे लग्न सर्वार्थाने गाजले होते.रमेश देव,यांचे सीमा देव, यांच्यावर निस्सीम प्रेम होते.प्रत्येक वाढदिवसाला ते सीमाजींना मौल्यवान भेट वस्तू देत असत.
एकदा,ही भेटवस्तू घेण्यास सीमाजींनी नकार दिला होता.त्यावेळी रमेश देव म्हणाले होते की, ‘ही भेटवस्तू राहूदे,काय माहीत मी उद्या असेन किंवा नसेन’ हे ऐकताच सीमा देव यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले होते. रमेश देव आपल्या अखेरच्या दिवसातही खूप उत्साही होते.आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आपण साजरा केला पाहिजे,हे त्यांचे मत होते.सिमा देव अल्झायमर आजारामुळे आपल्याला ओळखत नाही,ही खंत त्यांच्या मनात सलत राहिली.आज सीमा देव यांच्या निधनाच्या बातमीने अशा आठवणी रसिक प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहून जातील,यात शंका नाही.सीमा देव यांना 'कोरपना Live' कडून भावपूर्ण श्रद्धांजली.
#Very sad news..
#Veteran Actress Seema Dev Passed Away..
💠🔸💠🔸💠🔸💠🔸💠🔸💠🔸💠