Chandrapur : शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत आनंदनगर महाकाली कॉलरी परिसरातील एका घरातून एम.डी.(मेफेड्रोन)ड्रग्जचा साठा जप्त केला आहे.या कारवाईत 19.220 ग्रॅम वजनाचे,अंदाजे 42 हजार 284 रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार,12 नोव्हेंबर 2026 रोजी शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एनडीपीएस कायद्याच्या तरतुदींनुसार आनंदनगर महाकाली कॉलरी,चंद्रपूर येथील शुभम वासेकर(वय 24) आणि संजय वासेकर(वय 52),यांच्या निवासस्थानी झडती घेण्यात आली.या झडतीदरम्यान 19.220 ग्रॅम निव्वळ वजनाचे एम.डी.(मेफेड्रोन) ड्रग्स आढळून आले.त्याची किंमत 42 हजार 284 रुपये असल्याचे सांगण्यात आले.याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध शहर पोलीस स्टेशन,चंद्रपूर येथे संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून,त्यांना अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.या कारवाईत सपोनि.कृणाल रामटेके,पोउपनि.दत्तात्रय कोलटे,पोहवा.संजय धोटे,संतोष दंडेवार,नापोअं.कपूरचंद खरवार,पोलीस अंमलदार योगेश पिदूरकर,खंडेराव माने,निलेश ढोक,विक्रम मेश्राम,प्रशांत कुसारे,सुशांत घिवे आणि मपोअं.लीना काटवले,यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
#Chandrapur Crime News.

