Chandrapur :- जिल्ह्यातील बल्लारपूर तालुका येथील विसापूर गावात एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 18 जुलै शुक्रवार रोजी दुपारी अंदाजे 4 च्या सुमारास घडली.दुर्गा प्रकाश चिंचोलकर वयवर्ष 19 असे मृत तरुणीचे नाव असल्याचे कळते.
प्राप्त माहितीनुसार,दुर्गाच्या वडीलाचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते.ती आई आणि भावासोबत राहत होती. घटनेच्या वेळी तिची आई काही कामानिमित्त घराबाहेर गेली होती.तर भाऊ देखील घरी नव्हता.या दरम्यान दुर्गाने घरातील पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला.सदर घटनेची माहिती मिळताच विसापूर पोलीस चौकीचे कर्मचारी अजय झोडे आणि राकेश मेंढे घटनास्थळी पोहोचले.त्यावेळी दुर्गा मृत अवस्थेत आढळली.पंचनामा करून तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला.या प्रकरणी विसापूर पोलिसांनी मर्ग दाखल केला असून,सहाय्यक पोलीस निरीक्षक करिष्मा मोरे,यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकची तपास सुरू आहे.आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.सदर घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
#Chandrapur District Suicide Case...
#Young Woman Commits Suicide by Hanging Herself...
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@