Chandrapur : जिल्ह्यातील शेगाव येथे एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एक महिन्यांपूर्वी तीन जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.सदर प्रकरणी 11 जुलै रोजी दुपारी अंदाजे 1 ते 2 च्या सुमारास पिडीत मुलगी आणि त्याचे वडील,यांनी शेगाव पोलीस स्टेशन,येथे येवून तक्रार दिली की,गेल्या 24 मे 2025 रोजी आरोपीने तिच्यावर अत्याचार करून सदर अत्याचाराचे व्हिडीओ तयार करून सोशल मिडियावर वायरल केला आहे.घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सदर तक्रारीवरून शेगाव पोलीसांनी तात्काळ दखल घेतली.सदर घटनेतील 3 आरोपींना अटक करून कलम 70(2),123,भारतीय न्याय संहिता-2023 सहकलम 4,6 पोक्सो कायदा,सहकलम 66 (ई)67(अ)माहिती व तंत्रज्ञान अधिनियम अन्वये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचे गांभीर्य पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी भेट दिली.दरम्यान वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव,उपविभाग चिमुर हे स्वतः सदर गुन्ह्याची तपास करीत आहे.
"नागरिकांना आवाहन."
सदर प्रकरणी कोणत्याही प्रकारचा फोटो,व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारीत करु नये व पोलीसांना सहकार्य करावे. अशा प्रकारच्या फोटो,व्हिडीओ प्रसारीत केल्यास संबंधीता विरुध्द सुध्दा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
#Chandrapur Crime News....
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@