Illegal Transportation of Cattle : गोवंश जनावरे तस्करीवर गडचांदूर पोलिसांची धडक कारवाई!| Marathi News.

News@Cattle Smuggling...

Gadchandur : जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या निर्देशानुसार अवैध धंद्यांविरुध्द कारवाईसाठी गडचांदूर पोलीस नेहमीप्रमाणे पोलीस स्टेशन हद्दीत गस्तीवर असताना 12 जुलै रोजी डी.बी.पथकाला गोपनिय माहिती मिळाली की,भोयगाव ते कोरपना मार्गे एका आयचर वाहनातून गोवंश जनावरांची अवैधरित्या वाहतूक होणार आहे.सदर माहितीवरून डी.बी.पथकाने तात्काळ भोयगाव-नारंडा टिपाईंट जवळ नाकाबंदी करून विरूद्ध दिशेने येणाऱ्या आयचर वाहनाला थांबवले.दरम्यान पंचासमक्ष वाहनांची पाहणी केली असता त्यामध्ये 39 गोवंश जनावरे(गाय,बैल)क्षमतेपेक्षा जास्त संख्येने अत्यंत निर्दयीपणे वाहनात डांबून असलेले मिळून आले.

            यावरून वाहनातील 39 जनावरे व वाहतुकीसाठी वापरलेले आयचर वाहन क्रं.MH/40/TC/4812,असे एकुण किंमत अंदाजे 19 लाख,10 हजारांचा मुद्देमाल जप्त करून हाफिज़ खान गुफरान खान गडचांदूर.करीम खान नबी खान गडचांदूर.सादीक नवाब खान गडचांदूर.शेख इब्राहिम शेख इस्माईल नागपूर,या 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे.गडचांदूर पोलीस स्टेशन येथे आरोपींवर संबंधीत कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गोवंश जनावरांना चंद्रपूर येथील प्यार फाऊंडेशन येथे जमा पाठवण्यात आले आहेत.

       सदरची धडाकेबाज कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र जाधव गडचांदूर, यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम, यांच्या नेतृत्वात परिमपोउपनि राधीका गायकवाड,डि.बी.पथकातील पोहवा-शितल बोरकर,नापोअं.बलवंत शर्मा,पोअं.प्रकाश बाजगीर,सुरज ढोले,मनोहर जाधव,साईनाथ उपरे,पोलीस स्टेशन गडचांदूर येथील वाहतुक कर्मचारी पोअं.श्रीनीवास सोडनर,रमेश कार्लेवाड यांनी केली आहे.सदरच्या कारवाईमुळे अवैधरित्या गोवंश जनावर तस्करांचे धाबे दणाणले असून कारवाईचे सत्र सुरू आहे.

#Illegal Transportation of Cattle...

#Action by Gadchandur Police...

#Chandrapur District Crime News....

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

-:Advertisement:-