Crime News : कॉपर केबल चोरीचे धागेदोरे उलगडले; तिघे अटकेत,तिघे फरार!|Marathi News.

News@Crime...

Chandrapur : राजुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गौरी खदान येथील कॉपर केबल चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने(LCB), उघडकीह आणला आहे.या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक करून चोरीस गेलेला अंदाजे 15 हजार रुपये किमतीचा कॉपर केबल वायरचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राजुरा पोलीस स्टेशन येथे 19 नोव्हेंबर 2026 रोजी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा क्रमांक 826/26,कलम 303(2)भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान चोरीचा मुद्देमाल हस्तगत करून 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले.त्यानंतर पुढील तपासासाठी आरोपी व जप्त मुद्देमाल राजुरा पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आला.

अटक करण्यात आलेले आरोपी :

1) अमन हरिश्चंद्र केसकर (वय 19),रा.सरदार पटेल वॉर्ड, बल्लारपूर जि.चंद्रपूर.

2) अतिश बालाजी पवनकर(वय 21),रा. सास्ती,ता.राजुरा जि.चंद्रपूर.

3) इलियास अहमद खान(वय 37),भंगार दुकानदार,रा.गणपती वॉर्ड,बल्लारपूर,जि.चंद्रपूर.

पाहिजे असलेले आरोपी :

1) अंकित दुम्पाला,रा.सास्ती,ता.राजुरा.

2) राहुल निषाद,रा.भगतसिंग वॉर्ड,बल्लारपूर.

3) अंकित सिंग,रा.सास्ती ता.राजुरा.

मुद्देमाल जप्त :

या कारवाईत चोरीस गेलेली अंदाजे 15 हजार रुपये किमतीची कॉपर केबल वायर जप्त करण्यात आली आहे.या प्रकरणातील अन्य 3 आरोपींचा शोध सुरू आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात उपविभागीय राजुरा पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.

#Chandrapur District Crime. #Action by LCB Chandrapur.

                      ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢