Chandrapur : गोवंशीय जनावरांच्या अवैध तस्करीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने(LCB)मोठी कारवाई करत 57 गोवंशीय जनावरांची क्रूर वाहतूक रोखली.रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील अजयपूर परिसरात 21नोव्हेंबर 2026 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून 18 चाकी ट्रेलर ट्रकमधून वाहतूक करण्यात येत असलेली ही जनावरे ताब्यात घेण्यात आली.या कारवाईत 9 जनावरांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले असून,उर्वरित 48 जनावरांची सुटका करण्यात आली आहे.Local Crime Branch takes strong action.
सदर जनावरांना चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता ट्रकमध्ये दाटीवाटीने कोंबण्यात आले होते.तसेच त्यांना आखूड दोराने बांधून अत्यंत अमानूषपणे वाहतूक केली जात होती.सुटका करण्यात आलेल्या जनावरांना पुढील उपचार,चारा-पाणी व देखभालीसाठी तातडीने प्यार फाउंडेशन,पडोली(चंद्रपूर),येथे दाखल करण्यात आले आहेत.या कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण 35 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून,एका आरोपीला अटक केली आहे.
'अटक आरोपी' :
1) नईमुद्दीन करिमुद्दीन शेख,(वय 40,रा.घुग्घुस).
'फरार आरोपी' :
1) इम्रान शेख.
2) इर्शाद खान.
3) मोहम्मद साकिब मोहम्मद शकूर,(तिन्ही रा. मूर्तिजापूर,जि.अकोला).
'जप्त मुद्देमाल' :
▪️ट्रेलर ट्रक 30 लाख रुपये.
▪️57 गोवंशीय जनावरे 5 लाख 70 हजार रुपये.
▪️एक मोबाईल फोन 10 हजार रुपये,असा एकूण 35 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध रामनगर पोलीस स्टेशनमध्ये प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम 1960,महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम(सुधारित)2015 तसेच भारतीय न्याय संहितेतील(BNS)लागू तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास रामनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.
'LCB पथकाची कारवाई' :
जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे,यांच्या नेतृत्वात ब्रम्हापूरी उपविभागातील स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपूच्या पथकाने ही कारवाई केली.
#Chandrapur District Crime News. #Cattle smuggling. #Local Crime Branch takes strong action.

