Shocking incident : दोन वर्षीय चिमुकलीच्या अंगावर TV पडून मृत्यू! |Marathi News...

News@Shocking incident...

            Chandrapur : जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील सुरबोडी येथे 9 जून सोमवार रोजी रात्री 8 च्या सुमारास एका 2 वर्षीय चिमुकलीच्या अंगावर TV पडल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिद्धी सचिन सहारे,असे मृतक चिमुकलीचे नाव असल्याचे कळते.सुरबोडी येथील सचिन सहारे,हे कुटूंबियांसोबत घरी जेवन करीत असताना शेजारीस त्यांची एक 5 वर्षाची मुलगी व दुसरी 2 वर्षाची चिमुकली रिद्धी,या दोन्ही मुली खेळत होत्या.दरम्यान जवळच नादुरूस्त असलेली TV एका टेबलावर ठेवून होती.खेळता-खेळता रिद्धीचा धक्का त्या टेबलला लागला.पाहता-पाहता TV तिच्या डोक्यावर पडली आणि यामध्ये ती गंभीर जखमी झाली.तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून रक्तस्त्राव झाला.लगेच तिला ब्रह्मपूरीच्या ख्रिस्तानंद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.सदर घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळा आहे.

#Shocking incident...

#2 years Girl Death Case...

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

-:Advertisement:-