Chandrapur : चिमुर तालुक्यातील नेरी रोडवरील भूमी एम्पायरच्या ले-आउटमध्ये असलेल्या कडुलिंबाच्या झाडावर एका तरुणाने त्याच्या मैत्रिणीसमोर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.प्रीतम यशवंत वाकडे वयवर्ष 25 पिंडकेपार, असे तरूणाचे नाव आहे.राष्ट्रसंत तुकडोजी कॉलेजमध्ये मैत्रिणीचा मंगळवारी(20)MA चा पेपर होता.ती पेपर द्यायला आली होती.प्रीतमला हे कळताच तोही त्याला भेटण्यासाठी चिमूरला आला.पेपर संपताच दोघेही चिमूर-नेरी रोडवरील भूमी एम्पायर ले-आउटवर पोहोचले.यावेळी लग्न आणि इतर बाबींवर चर्चा करत असताना,त्यांच्यात वाद झाला.आता मी स्वतःला फाशी देईन,असे म्हणत त्याने मैत्रिणीच्या डोळ्यासमोर जवळच्या कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेतला.
दरम्यान,प्रेयसीने तिच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली. चिमूर पोलिसांना कुटुंबाकडून माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बकल,सहायक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर आणि सहायक उप-पोलीस निरीक्षक विलास निमगडे घटनास्थळी पोहोचले.पंचनामा तयार केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाखवला.बुधवारी(21)शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला,असे सहायक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर यांनी सांगितले.
#Suicide News...
#A Young Man Committed Suicide by Hanging Himself in Front of his Girlfriend...