Chandrapur-Visapur Toll Palaza : चंद्रपूर-बल्लापूर मार्गावरील विसापूर टोलनाक्यावर टोल वाचविण्याच्या प्रयत्नातून एका चारचाकी वाहन चालकाने चक्क टोल कर्मचार्याच्या अंगावरून नेले.यामध्ये टोल कर्मचारी गंभीर जखमी झाला.संजय अरूण वांढरे वयवर्ष 27 रा.गांधी वार्ड बल्लारपूर,असे जखमी झालेल्या कर्मचार्याचे नाव आहे. सदर धक्कादायक घटना 8 जून रविवार रोजी रात्री 12/40 च्या सुमारास घडली.एक 'टाटा S' वाहन बल्लारपूरवरून चंद्रपूरकडे माल घेऊन जात होता.वाहन चालक विसापूर येथील टोलनाका वाचवण्यासाठी टोल प्रची लेनवरून जात असताना टोल कर्मचारी संजयने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला.तसेच तेथील उपस्थित कर्मचार्यांनी सुद्धा वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला.परंतु टाटा S चा चालक थांबला नाही,त्याने चक्क संजयच्या अंगावरून वाहन नेला. त्यामध्ये संजय जखमी झाला.बरगडीची हाडे तुटली असून सध्या त्याच्यावर चंद्रपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटनेनंतर चालक फरार झाला होता. बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यात आली.पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.
#Crime News...
#Chandrapur-Visapur Toll Naka...
#Shocking incident at Visapur toll Naka...
@@@@@@@@@@@@@@@@