Chandrapur : जिल्ह्यातील भद्रावती येथील आयुध निर्माणीत बिबटे आणि वाघांचे नेहमी दर्शन घडत असतात. आता तर येथील वसाहतीत चक्क एका 12 फुटाच्या अजगराने हजेरी लावली.वसाहतीतील सेक्टर 6 मध्ये असलेल्या 'इंद्रप्रस्थ गार्डन'च्या अगदी मेन गेटवरच हा अजगर गुंडाळी मारून होता.याची माहिती सर्पमित्र अनूप येरणे व आशिष चहाकाटे यांना देण्यात आली.त्यांनी आपले सहकारी श्रीपाद भाकरे,बंटी मंडल व इम्रान खान, यांच्यासह घटनास्थळी येऊन मोठ्या शिताफीने अजगराला ताब्यात घेतला आणि त्याला जंगलातील सुरक्षित अधिवासात सोडोले.या गार्डनमध्ये लहान मुले नेहमी खेळत असतात हे मात्र विशेष.
#Python in Ordnance Factory Chandrapur..
#Python News....
#Chandrapur...
#Bhadravati...